Breaking


जुन्नर : आदिवासी समाजाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य प्रकरणी करणाऱ्या सुरज चव्हाण याच्यावर कारवाई करण्याची मागणी


जुन्नर
 (पुणे) : आदिवासी समाजाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य प्रकरणी करणाऱ्या सुरज चव्हाण याच्यावर करवाई करा, अशी मागणी आदिवासी विचार मंच व बिरसा ब्रिगेड सह्याद्री च्या वतीने जुन्नर पोलीस स्टेशन यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

सविस्तर माहिती अशी की, फेसबुकच्या एका पेजवर दिं.13 जून 2021 रोजी आदिवासी समाजाबद्दल सुरज चव्हाण यांनी आक्षेपार्ह संवाद केला आहे. तसेच अॉफिसियल सुरज चव्हाण इन्स्टाग्राम खात्यावर देखील तो व्हिडीओ अपलोड करण्यात आला होता.

सुरज चव्हाण व त्याच्या साथीदार यांना अनुसूचित जाती जमाती अत्याचार कायद्यान्वये व सायबर कायद्यानुसार योग्य ती कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. सबंधिंतावर कडक कारवाई न केल्यास आदिवासी विचार मंच आणि बिरसा ब्रिगेड सह्याद्रीच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे. 

निवेदन देतेवेळी जुन्नरचे अध्यक्ष शिवाजी मडके, शुभम उंडे, शुभम भवारी, तुषार वाळकोळी व बिरसा ब्रिगेडचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा