Breaking
जुन्नर : दिव्यांग बहिणीस आई, भावाला शिवीगाळ करत भावानेच काढले घराबाहेरदिव्यांग संघटनांची पोलिसांकडे तक्रार 


जुन्नर : जुन्नर तालुक्यातील मौजे कुसुर येथील दिव्यांग भगिनी जयश्री वसंत दुराफे या महिलेस तिच्या स्वमालकीच्या घरांमधून तिच्या भावाने अपमानास्पद वागणूक देऊन शिवीगाळ करून, (२५ जून) रोजी घरांमधून बाहेर काढले होते. तिला न्याय मिळवून देण्यासाठी व तिचे हक्काचे घर तिला परत मिळवून देण्याची मागणी दिव्यांग विकास संस्थेने एका निवेदनाद्वारे जुन्नर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विकास जाधव यांच्याकडे केली आहे.


सविस्तर वृत्त असे की, दिनांक 25 जून रोजी,  दुपारी चार वाजता दिव्यांग महिला जयश्री दुराफे, तिचा पॅरेलेस झालेला बंधू, व डायबिटीस ग्रस्त आई, या तिघांना भावाने, अपमानास्पद वागणूक देऊन शिवीगाळ करत  रात्री नऊ वाजता घरामधून बाहेर काढले होते. 


हि माहिती समजताच प्रहार संघटनेचे कार्यकर्ते सोमनाथ भोसले यांना समजल्यानंतर पुणे येथील दिव्यांग विकास आघाडी संस्था पुणे जिल्हा चे संस्थापक अध्यक्ष बाजीराव उर्फ नानासाहेब पारगे यांंनी सांगितले. त्यानंतर प्रहार जनशक्ती रूग्ण सेवक व श्री राधेश्याम दिव्यांग सशक्तिकरण केंंद्र चे  दीपक चव्हाण, अरुण शेरकर यांनी घटनास्थळी भेट देऊन घटनेची माहिती घेतली. पिडितांना मदतीचे आश्वासन दिले.


आज दि. 26 जून रोजी प्रहार अपंग क्रांती संघटना, दिव्यांग विकास संस्था, अपंग जनता दल, रुद्र दिव्यांग सामाजिक संस्था, या सर्व संघटनेच्या माध्यमातून जुन्नर पोलीस ठाणे चे पोलीस निरीक्षक यांना पीडित महिलेला न्याय मिळवून देण्यासंदर्भात, व तिचे हक्काचे घर मिळवून देण्यासंदर्भात निवेदन देऊन तिचे घर तिच्या ताब्यात देण्यात आले. 


तसेच दिव्यांगांच्या शेतजमीनीवर जबरदस्ती कब्जा केला आहे, त्यांंना लवकरच दिव्यांग 2016 च्या  कायदा नुसार गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.


यावेळी, दिव्यांग विकास संस्था संस्थापक अध्यक्ष,  नानासाहेब पारगे, प्रहार अपंग क्रांती संघटनेचे सोमनाथ भोसले, दिव्यांग प्रकोष्ठ राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रदीप कामटे, अपंग जनता दलचे भाऊसाहेब जगदाळे, रुद्र दिव्यांग सामाजिक संस्था पुणे व प्रहार रूग्ण सेवक व श्री राधेश्याम दिव्यांग सशक्तिकरण केंद्र महाराष्ट्र राज्य ग्रूपचे संस्थापक अध्यक्ष दिपक चव्हाण, अध्यक्ष अरुण शेरकर, उपाध्यक्ष राहुल मुसळे, सौरभ मातेले, सविता ताई दुराफे, ज्ञानदेव बांगर आदी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा