Breakingजुन्नर : ग्रामपंचायत खामगाव येथे 'स्वप्नस्पृती महिला ग्रामसंघ' स्थापन !


जुन्नर (पुणे) : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद) अंतर्गत जुन्नर पंचायत समितीच्या माध्यमातून ग्रामपंचायत खामगाव येथे "स्वप्नस्पृती महिला ग्रामसंघ" स्थापन करण्यात आला.


ह्यावेळी प्रभाग समन्वयक सुनिता सुवर्णाकर, आरती डोके, शोभा घोलप आणि ३० बचत गटांच्या अध्यक्षा आणि सचिव महिला उपस्थित होत्या. यावेळी ग्रामसंघाच्या पदाधिकारी महिलांची सर्वानुमते निवड करण्यात आली त्या सर्व महिलांचे ग्रामपंचायत खामगावच्या वतीने करण्यात आले.

अनेक वर्षांपासून चालत आलेल्या 'चूल आणि मूल' य  संकल्पनेच्या बाहेर पडून प्रत्येक कुटुंबातील महिला सक्षम झाली पाहिजे. तिच्या सोबत कुटुंबाचा आर्थिक उत्पन्नाचा आलेख वाढून समाजात तिला सन्मान मिळाला पाहिजे. यासाठी बचत गटाचे फायदे, ग्रामपंचायत-पंचायत समिती-जिल्हा परिषदेच्या विविध योजना, महिलांच्या आरोग्याविषयक समस्या, बचत गटाच्या माध्यमातून रोजगार निर्मिती, मनरेगा विभागाच्या माध्यमातून विविध योजना तसेच अनेक संस्थांमार्फत महिलांसाठी राबविण्यात येणाऱ्या प्रशिक्षण शिबीर आणि इतर गोष्टींवर सविस्तर चर्चा झाली.

खामगाव गावच्या सामाजिक-राजकीय कार्यात त्यांनी सक्रिय सहभाग घेऊन योगदान दिल्यास एक वेगळा आदर्श महाराष्ट्रात निर्माण होईल. त्यासाठी त्यांनी केलेल्या व्यक्तिगत व सार्वजनिक समस्यांसाठी तसेच मागण्यांसाठी खासदार डॉ.अमोल कोल्हे, आमदार अतुल बेनके, माजी जिल्हा परिषद सदस्य भाऊ देवाडे आणि अंजनी उन्नती फाऊंडेशनच्या संस्थापिका गौरीताई अतुल बेनके ह्यांंच्या माध्यमातून सोडवण्यासाठी कटिबद्ध राहील, असे उपसरपंच अजिंक्य घोलप म्हणाले.

यावेळी ग्रामपंचायत सदस्या वैशाली नेहरकर, कुसूम केदारी उपस्थित होत्या. तसेच गावच्या सरपंच सुवर्णा जाधव व माजी उपसरपंच राजु डुंबरे यांनी ह्या कार्यक्रमाला शुभेच्छा देत सर्वोतोपरी सहकार्य करणार असल्याचे सांगितले.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा