Breaking
जुन्नर : तांबे येथे ललित जोशी स्पोर्ट्स फाऊंडेशनच्या वतीने आयोजित व्यायाम प्रशिक्षण शिबिर संपन्नजुन्नर : जुन्नर तालुक्यातील तांबे या ठिकाणी कै. प्रवीणभाऊ जोशी सार्वजनिक व्यायाम शाळेचे उद्घाटन आमदार अतुल बेनके यांच्या हस्ते ६ जून २०२१ रोजी करण्यात आले होते, या व्यायामशाळेत आधुनिक प्रकारचे व्यायाम साहित्य उपलब्ध झाले असून या मशीन वापराबाबत आज (ता. २०) प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले होते.


कै.प्रवीण भाऊ जोशी सार्वजनिक व्यायाम शाळेत ललित जोशी स्पोर्ट्स फाऊंडेशनच्या वतीने व्यायाम प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या प्रशिक्षणासाठी प्रशिक्षक म्हणून IFSI सर्टिफाइड ट्रेनर दादासाहेब मोरे हे उपस्थित होते. यावेळी शिबिरासाठी गावठाण व वाड्या-वस्त्या मधील ३० ते ४० तरुण उपस्थित होते. त्यावेळी किरण लोहकरे यांनी उपस्थितांचे व प्रशिक्षकांचे स्वागत केले. तसेच, ज्येष्ठ नागरिक शिवाजी मडके यांच्या हस्ते प्रशिक्षक दादासाहेब मोरे यांचा व ऍड. ललित जोशी यांच्या हस्ते योग प्रशिक्षक प्रमिला भोकरे यांचा सत्कार करण्यात आला. प्रशिक्षणा वेळी पोलीस पाटील संजय मडके देखील उपस्थित होते.


प्रशिक्षकांनी युवकांना व्यायामाचे महत्त्व सांगून जिम मधील व्यायाम प्रकार शिकविले. व्यायाम साहित्य व मशिनवर व्यायाम करण्याचे प्रात्यक्षिक त्यांनी स्वतः सादर केले व उपस्थित युवकांकडूनही ते करून घेतले.व्यायाम करण्यापूर्वी वॉर्मअपचे विविध प्रकार व व्यायाम झाल्यानंतर स्ट्रेचिंगचे विविध प्रकार त्यांनी शिकविले. व्यायामाबरोबरच मुलांनी संतुलित आहार कसा घ्यावा? त्यात कोणकोणत्या पदार्थांचा समावेश असावा व विविध सप्लीमेंट्स बाबतची माहिती ही त्यांनी सांगितली. उपस्थित युवकांनी त्यांच्या व्यायामाबाबतच्या शंका-कुशंका प्रशिक्षकांना विचारल्या व प्रशिक्षकांनी ही त्यांना समाधानकारक उत्तरे दिली. 


या प्रशिक्षणाचा उपयोग युवकांना शास्त्रीय पद्धतीने व्यायाम करण्यासाठी, संतुलित आहार घेण्यासाठी व स्वतः चे व्यायामाचे नियोजन करण्यासाठी होणार आहे. प्रशिक्षणात दिलेल्या माहितीचा उपयोग करून व्यायाम केल्यास कुस्ती व कबड्डीच्या खेळाडूंना या प्रशिक्षणाचा उत्तम शरीरयष्टी तयार करण्यासाठी खूप फायदा होईल असे मत प्रशिक्षक दादासाहेब मोरे यांनी व्यक्त केले. या व्यायाम प्रशिक्षणासाठी सुधीर मडके, प्रभाकर मिंढे, अजित पारधी, संदिप ना. मडके, संदिप मिंढे, दादू मडके, मंगेश मिंढे, संदिप मोरे, सागर बांबळे, अविनाश बांबळे, प्रदीप ताते, दिलीप शिंदे, गणेश भांगे, नितीन भांगे, निलेश मडके, गौरव मिंढे, रोहीत मडके, सागर भांगे, शुभम मडके, शुभम वाळुंज, निखील मोरे, किरण मडके, निखिल मडके, दिनेश मडके, दीपक मडके व इतर अनेक युवक उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा