Breaking


जुन्नर : उंडेखडक येथे क्रॉपसॅप अंतर्गत शेतीशाळा संपन्न !


जुन्नर (पुणे) : मौजे उंडेखडक (ता. जुन्नर) या ठिकाणी क्रॉपसॅप अंतर्गत शेतीशाळा संपन्न झाली. तालुका कृषी अधिकारी सतिश शिरसाट, मंडळ कृषी अधिकारी दत्तात्रय जाधव, कृषी सहाय्यक अमोल मोरे यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.


शेतकऱ्यांना बाजार मूल्य साखळी तयार करण्याच्या दृष्टीने शेतकरी उत्पादक कंपनी व त्यांच्याकडून अपेक्षित कार्य याबाबत चर्चा व नियोजन, दहा टक्के रासायनिक खतांची बचत, भात शेतीत युरिया ब्रिकेटचा वापर, पिक विमा, व शेती संदर्भात विविध योजनांचे मार्गदर्शन करण्यात आले.   

या कार्यक्रमाला पंचायत समितीचे सदस्य काळू गागरे, सामाजिक कार्यकर्ते निलेश रावते, गावच्या पोलीस पाटील तोटे व ज्येष्ठ नागरिक देवराम नांगरे, गावचे प्रगतशील शेतकरी भगवंता नांगरे व प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा