Breaking


जुन्नर : शेतकरी प्रश्नांसाठी किसान सभेची निदर्शने, केल्या "या" महत्वपूर्ण मागण्या !


जुन्नर, दि. १७ : अखिल भारतीय किसान सभा जुन्नर तालुका समितीच्या वतीने शेतकरी प्रश्नांसाठी बेळेआळी जुन्नर येथे निदर्शने करण्यात आली. तसेच नायब तहसीलदारांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

 


दूध उत्पादक शेतकऱ्यांची लूट त्वरीत थाबवा, शेतकऱ्यांना मुबलक खते, दर्जेदार बी - बियाणे उपलब्ध करून द्या, वीज बिले माफ करा, दुधाला 40 रुपये भाव द्या, आदिवासी भागातील वादळामुळे सलग दोन वर्षे जी नुकसान झाली त्याची नुकसान भरपाई मिळावी, आदिवासी भागात रॉकेल मिळालेच पाहिजे, रोजगार हमी कायद्यांतर्गत रोजगार मिळालाच पाहिजे मागण्या घोषणा देऊन करण्यात आल्या. तसेच किसान सभेचे तालुका अध्यक्ष डॉ. मंगेश मांडवे यांनी उपस्थितांना संबोधित केले  

यावेळी किसान सभेचे सचिव लक्ष्मण जोशी, पुणे जिल्हा उपाध्यक्ष विश्वनाथ निगळे, आंबे गावचे सरपंच मुकुंद घोडे, कोंडीभाऊ बांबळे, संजय साबळे, गणपत घोडे, दीपक लाडके, पिलाजी शिंगाडे हे उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा