Breaking
जुन्नर : चावंड ग्रामपंचायतीमध्ये पेसा निधीचा गैरवापर, दोषींवर कारवाईची मागणी


जुन्नर (पुणे) : जुन्नर तालुक्यातील पश्चिम आदिवासी भागातील चावंड ग्रुप ग्रामपंचायतीमध्ये पेसा निधीचा गैरवापर केल्याचा प्रकार समोर आला आहे.


पेसा निधीच्या गैरवापराची सखोल चौकशी करुन दोषींवर कारवाई करण्याची मागणी ग्रुप ग्रामपंचायत चावंड च्या उपसरपंच माधुरी कोरडे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी पुणे व गटविकास अधिकारी जुन्नर यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

शासन निर्णय दिनांक 21 एप्रिल 2015 च्या नुसार पेसा अबंध निधी कोणत्या कामासाठी वापरावा व कोणत्या कामासाठी वापरू नये हे स्पष्टपणे दिले असतानाही हा निधी अनावश्यक बाबींवर खर्च करण्यात आला आहे. शिक्षण, आरोग्य, रोजगार व इतर पायाभूत सुविधांची वानवा असताना आणि धरण शेजारी असूनही लोकांना पाणी विकत घेऊन प्यावे लागते. असे असतानाही पायाभूत सुविधांवर पेसा अबंध निधी चा वापर करण्याऐवजी तो मंदिर सुशोभीकरण सारख्या अनावश्यक बाबींवर खर्च होत आहे. ही फार धक्कादायक बाब आहे आणि पेसा कायद्याच्या विरुद्ध आहे. दोषींवर कारवाई झाली पाहिजे.

माधुरी कोरडे, उपसरपंच
ग्रुप ग्रामपंचायत चावंड

निवेदनात म्हटले आहे की, ग्रुप ग्रामपंचायत चावंड अंतर्गत पेसा गाव केळी व पेसा गाव माणकेश्वर येथे ५ टक्के पेसा अबंध निधीचा वापर कुंभाई माता मंदीर केळी व वेताळबाबा मंदिर माणकेश्वर चौथरा व सुशोभीकरण या कामासाठी वापरण्यात आला आहे.

पेसाचा निधी मंदीरांसाठी वापरण्यात आलेला नाही, तो निधी मंदीराच्या ओट्यासाठी वापरण्यात आला आहे. याला ग्रामपंचायतीची मंजूर आहे. सदर कामाचे पेसे अजून देण्यात आलेले नाही.

डिंपल विरणक, ग्रामसेविका,
ग्रुप ग्रामपंचायत चावंड

पेसा कायद्यानुसार "५ टक्के पेसा अबंध निधी" ग्रामपंचायत प्रवेशद्वार अथवा तत्सम सुशोभीकरणाची कामे करण्यात येऊन नये, असे शासन निर्णयात असतानाही व या शासन निर्णयाची कल्पना ग्रामसेवक यांना देऊनही ग्रामपंचायतींने हा निधी मंदीर व सुशोभीकरणासाठी खर्च करण्यात आल्याचे कोरडे यांनी म्हटले आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा