Breakingजुन्नर : एक पाऊल कोरोना मुक्तीकडे, ग्रामपंचायत खामगावचा अभिनव उपक्रम


आपलं गाव, आपली जबाबदारी अंतर्गत डोअर टू डोअर सॅनिटायसर फवारणी


जुन्नर, दि. ९ : WHO ने निर्देशीत केल्या प्रमाणे केंद्र सरकारच्या निती आयोगाच्या माध्यमातून आज ग्रामपंचायत खामगावमध्ये 'डोअर टू डोअर सॅनिटायसर फवारणी' ह्या उपक्रमाला सुरुवात केली. त्यामध्ये तीन टप्पे असून गावातील प्रत्येक कुटुंब, बाहेरचा परिसर आणि घराच्या आतील बाजू केंद्र सरकारच्या माध्यमातून फवारण्याचे उद्दिष्ट राबविले जाणार आहे. त्यात वाड्या वस्त्यांवरील सर्वच कुटुंबाचा समावेश आहे. आज गावठाण येथे ह्या सर्व कर्मचाऱ्यांचा सत्कार गावच्या वतीने जेष्ठ नेते उपसरपंच गिरीधर नेहरकर ह्यांच्या हस्ते करण्यात येऊन उपक्रमाचा शुभारंभ केला.

'आपलं गाव आपली जबाबदारी' ह्या मोहीमे अंतर्गत कोरोना काळात आपण गावातील लोकांना पहिल्या लॉकडाऊनपासून गोळ्यांचे वाटप, घरा-घरात सुरक्षित काळजी घेण्याचे माहिती पत्रक, आदिवासी २५० गरीब कुटुंबांना अन्नधान्य किराणाचे किट वाटप, रुग्णांना गाडीने टेस्टसाठी ने-आन तसेच बेड, प्लाझ्मा, इंजेक्शन्स उपलब्ध करून देण्यासाठी मदत केली आहे. इतर सर्वच ग्रामपंचायत पदाधिकारी सदस्य देखील कोरोना संदर्भात काळजी घेण्यासाठी आपल्या गावात-वॉर्डात सक्रिय आहेत.

'एक पाऊल कोरोनामुक्तीकडे' ह्या दृष्टीने आमच्या सर्वच पदाधिकाऱ्यांचे गावात प्रयत्न सुरू आहेत. त्यामध्ये ग्रामपंचायत सरपंच सुवर्णा जाधव, उपसरपंच अजिंक्य घोलप, माजी उपसरपंच राजू डुंबरे, ग्रामसेवक आहेर, ग्रामपंचायत सदस्य, गावातील जेष्ठ मार्गदर्शक, युवक, महिला बचत गट, कोरोना योद्धे, प्राथमिक उपआरोग्य केंद्राचे डॉक्टर्स, आशा वर्कर्स, शिक्षक व ग्रामपंचायत कर्मचारी यांचे मार्गदर्शन, सहकार्य लाभले.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा