Breakingजुन्नर : खटकाळे गावाने कोरोनाला वेशीवरच रोखले, कसे ते पहा !जुन्नर, दि. १२ : जुन्नर तालुक्याच्या आदिवासी भागातील खटकाळे या गावांने गेल्या वर्षापासून कोरोनाला दूर ठेवण्यात यश मिळविले आहे. खटकाळे गावाची लोकसंख्या ११२९ असून या गावाने कोरोनाबाबत शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करत प्रामुख्याने गावात बाहेरून येणाऱ्या नागरिकांवर विशेष लक्ष केंद्रित केले. त्यामुळे कोरोना गावाबाहेर ठेवण्यात ते यशस्वी झाले. 


जुन्नर तालुक्यात कोरोनाच्या पहिल्या लाटेपेक्षा दुसरी लाट तीव्र ठरली. पश्चिम आदिवासी भागात पहिल्या लाटेत कोरोना शिरकाव झाले नव्हता, परंतु दुसऱ्या लाटेचा विळखा वाढत होता. परंतु नागरिक आणि प्रशासनाच्या सतर्कतेमुळे हे रोखणे शक्य झाले.


"कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर 'माझे गाव, माझी जबाबदारी' अंतर्गत केंद्र व राज्य सरकार यांनी घालून दिलेले नियम व अटींचे तंतोतंत पालन गेली एक वर्षापासून गावपातळीवर करत आहोत. यासाठी गावातील नागरिकांनी सहकार्य केले. गावच्या परिसराची स्वच्छता राखली. घरोघरी जनजागृती केली. ग्रामसेवक, आरोग्य सेवक, जिल्हा परिषद शिक्षक, अंगणवाडी कर्मचारी, आशा सेविका यांची विशेष मदत झाली. जनजागृतीचे फलक लावण्यात आले होते. नियम मोडणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याची सुचना दिले. गावातील जनतेसाठी निश्चितच ही परिस्थिती आव्हानात्मक राहिली आहे. परंतु आतापर्यंत आम्ही कोरोनाला वेशीबाहेरच रोखणे आहे."


- शकुंतला देवका मोरे, सरपंच

  ग्रुप ग्रामपंचायत खटकाळे - खैरे"शासनाच्या नियमांनुसार जनजागृती करण्यात आली. आशा, अंगणवाडी कर्मचारी, प्राथमिक शिक्षक यांनी घरोघरी जाऊन वेळोवेळी सर्वेक्षण केले. गावामध्ये लसीकरण कँम्प राबविण्यात आला होता. नागरिकांच्या सहकार्यामुळे आम्ही हे करु शकलो."

- के. टी. साबळे, ग्रामसेवक

   ग्रामपंचायत खटकाळे - खैरे
जुन्नर तालुक्यातील आजपर्यंतची आकडेवारी :


● एकूण रुग्ण - १५८०५

● बरे झालेले रुग्ण - १४८५२

● अॅक्टिव्ह रुग्ण - ३९८

● मृत्यू - ५५५


(दि. ११ जूनपर्यंतच्या आकडेवारीनुसार...)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा