Breaking
जुन्नर : लोकभारती पक्षाच्या शहर महिला अध्यक्षपदी रिना खरात यांची निवडजुन्नर, दि. २९ : लोकभारती पक्षाच्या वतीने जुन्नर शहर महिला अध्यक्ष पदी रिना राजू खरात व उपाध्यक्ष पदी शगुफ्ता इनामदार यांची निवड तालुका अध्यक्ष खालिद पटेल यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देऊन करण्यात आली. 


यावेळी जुन्नर शहर लोकभारती महिला सदस्य व सामाजिक कार्यकर्ता यास्मिन खलील इनामदार, जुन्नर शहर उपाध्यक्ष मुबीन जमादार, रफिक तकी, मुस्तफा सय्यद तसेच अनेक उपस्थित होते. 


यावेळी जुन्नर आणि परिसरात वारंवार घरकुलाबाबत महिलांची फसवणूक करण्यात आली. अनेक लोकांना गेल्या 4/5 वर्षा पासून रेशनिंग मिळत नाही, हजारो हेलपाटे मारूनही 12 अंकी नंबर मिळत नाही. पेंशन योजना तोंड पाहून मंजूर केल्या जातात. शासकीय अधिकारी आमचे म्हणणे ऐकून घेत नाही" अशा अनेक व्यथा स्थानिक महिलांनी मांडल्या.


यावेळी खालिद पटेल यांनी सर्व प्रश्नांबाबत योग्य तो पाठपुरवठा करून शासकीय अधिकार्‍यांना जाब विचारण्यात येईल व सर्व गोरगरिबांचे प्रश्न सोडविण्यात येईल असे सांगितले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा