Breaking




जुन्नर : रूपश्री महिला विकास संस्था आणि मंथन फाउंडेशन निरामय योग अभ्यास केंद्र पुणे यांच्या वतीने कोरोना रुग्णांसाठीचे योग शिबिर संपन्न



जुन्नर (पुणे) : रूपश्री महिला विकास संस्था जुन्नर आणि मंथन फाउंडेशन निरामय योग अभ्यास केंद्र पुणे यांच्या संयुक्त विद्यमानाने श्री गुरुबंकट स्वामी महाराज कोविड केअर सेंटर नेकनूर बीड येथे रोग प्रति वर्धक ऑनलाईन योग शिबिर दि. ३० मे ते २ जून रोजी आयोजित करण्यात आले होते.


करोना सेंटरमध्ये पेशंटच्या आरोग्यात योग व प्राणायामाच्या माध्यमातून रोग प्रतिकार शक्ती कशी वाढवावी तसेच त्याचे मानसिक व शारीरिक स्वास्थ्य उत्तम पद्धतीने राखले जावे याकरिता रूपश्री महिला विकास संस्था जुन्नर यांच्या अध्यक्षा अश्विनी नवले, मंथन फाउंडेशन निरामय अभ्यास केंद्र यांच्या योग शिक्षिका अर्चना पवार, गुरु बंकटस्वामी महाराज केअर सेंटरचे अध्यक्ष विलासराव रोकडे, कार्यवाहक सचिन थोरात यांच्या सहकार्याने तीन दिवसाचे शिबिर संपन्न झाले. तसेच, कोणत्याही प्रकारचे शुल्क न घेता पेशंटच्या जेवणाची उत्तम सोय करणारे 'गारवाचे हॉटेल मालक' उद्धव काळे  हे देखील तीन दिवस कार्यक्रमाला उपस्थित होते.


या शिबिराच्या निमित्ताने कोरोना सेंटरमधील असणाऱ्या पेशंटच्या आरोग्यात योग्य अशी सुधारणा होण्यासाठी तसेच त्यांची स्वतःची रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी उपयोगी पडणाऱ्या अनेक सूक्ष्म योगासनांचे व प्राणायामाचे कृतीयुक्त प्रशिक्षण योग शिक्षिका अर्चना पवार यांनी खूप सुंदर पद्धतीने घेतले.


यात कोणत्याही व्यक्तीकडून सहज करू शकल्या जाणाऱ्या खांद्यांच्या हालचाली, कमरेच्या हालचाली, शशांकासन, आद्वा सन, भुजंगासन आश्वासन, प्राणायामात सूर्य अनुलोम-विलोम कृती या कृतीचा समावेश होता. 


सध्याच्या परिस्थिती मध्ये योगा हा आपल्या जीवनामध्ये किती आवश्यक आहे, याचे महत्त्व या कार्यक्रमामुळे लक्षात आले. तसेच रुग्णांचे मन देखील प्रसन्न झाले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा