Breakingजुन्नर : कुकडी नदीच्या पात्रात दोन व्यक्ती बुडल्याची घटना, एका व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यूआळेफाटा (जुन्नर) : मंगरूळ पारगाव येथे कुकडी नदीच्या पात्रात दोन व्यक्ती बुडल्याची घटना आज दुपारी घडली, यामध्ये एका व्यक्तीला वाचवण्यात ग्रामस्थांना यश आले आहे तर दुसऱ्या व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.


पारनेर तालुक्यातील रांधे दरोडी गावातील दोन युवक मंगरूळ येथे कुकडी नदीच्या पाण्यात हातपाय धुण्यासाठी गेले असता त्यांना पाण्याचा अंदाज न आल्याने दोन्ही युवक पाण्यात बुडाले, त्यावेळी ग्रामस्थांनी त्यांना वाचवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले, त्यात एका युवकाला वाचवण्यात ग्रामस्थांना यश आले मात्र, दुसऱ्या युवकाला पाण्यातून काढण्यात उशीर झाल्याने त्यात त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. मानसुख मारुती मोरे (वय - ३८) असे या मृत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा