Breaking
जुन्नर : 'शिवसंस्कार सृष्टी' साकारण्याची संकल्पना प्रत्यक्षात येणार, जलसंपदा विभाग देणार जागाजुन्नर (पुणे) : 'शिवसंस्कार सृष्टी' साकारण्याची संकल्पना प्रत्यक्षात येणार असून जलसंपदा विभाग जागा देणार आहे. जलसंपदा विभागाची जागा देण्यास राज्याचे जलसंपदा मंत्री यांनी रीतसर प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.


शिवजन्मभूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जुन्नर तालुक्यातील 'शिवसंस्कार सृष्टी' हा खासदार डॉ. अमोल कोल्हे यांचा महत्वकांक्षी प्रकल्प आहे. यानिर्णयामुळे 'शिवसंस्कार सृष्टी' साकारण्याची संकल्पना प्रत्यक्षात येण्याचे स्पष्ट संकेत मिळाले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान असलेल्या शिवनेरी किल्ल्याच्या परिसरात 'शिवसंस्कार सृष्टी' उभारली जाणार आहे.


 'शिवसंस्कार सृष्टी' प्रकल्पासंदर्भात काल (गुरूवार दि.३ जून) मंत्रालयात ही बैठक पार पडली. या बैठकीला खासदार डॉ. अमोल कोल्हे, आमदार अतुल बेनके, जलसंपदा सचिव अविनाश सुर्वे, पर्यटन सचिव व्हल्सा नायर, कुकडी प्रकल्पाचे अधीक्षक अभियंता हेमंत धुमाळ हे उपस्थित होते.


जुन्नर तालुका पर्यटन तालुका म्हणून जाहीर झाला आहे. परंतु पर्यटन वाढीच्या दृष्टीने म्हणावे तसे प्रयत्न झाले नव्हते. या 'शिवसंस्कार सृष्टी' प्रकल्पामुळे पर्यटन मोठ्या प्रमाणावर वाढणार असून त्यातून तालुक्यात रोजगार निर्माण होणार आहे. प्रकल्प मोठा असून जुन्नरच्या लौकिकात भर घालणारा आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा