Breaking



कोल्हापूर : शिरोळे येथे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलन



कोल्हापूर, दि. २६ : केंद्र सरकारच्या शेतकरी कायद्याच्या विरोधात आज मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष च्या वतीने शिरोळ तहसीलदार कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आल्या.


यावेळी शेतकरी विरोधी काळे कायदे मागे घ्मा, सुधारित विज विधयेक रद्द करा, शेतमालाला हमीभाव देणारा कायदा करा आदी मागण्यांना घेऊन हे आंदोलन करण्यात आले.


या आंदोलनात अखिल भारतीय किसान सभा, शेतमजूर युनियन, शालेय पोषण आहार संघटना, आशा व गटप्रवर्तक युनियनचा सहभाग झाला आहे.


यावेळी नारायण गायकवाड, अरुण मांजरे, महादेव भंडारे, काशिनाथ शिकलगार, विनायक लोंखडे, मिना तांबडे, आकाताई तेली, नेत्रदिपा पाटील, बलवत कांबळे, कल्पना खोत, उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा