Breaking
कोल्हापूर : न लाजता, न दमता, न थकताकोल्हापूर / यश रुकडीकर : लॉकडाऊनचा फटका प्रत्येकालाच बसलाय. कमी वयाची मुलं देखील आपली कुटुंबाची, घराची विस्कटलेली घडी नीट करण्यासाठी म्हणून काम करतात न लाजता, न दमता, न थकता.


एकीकडे युवा वर्ग नैराश्चेच्या गर्तेत जाऊन व्यसनाच्या अधीन होताना आपल्याला दिसतो. तर दुसरी कडे समाजात असेही युवा आहेत जे मेहनत करतायत. जिद्दीने हाती घेतलेलं काम पूर्ण करतायत.


          'इतुकीच होते कमाई

         दिवसाच्या कष्टातून

         ह्या कमाईतून मिळते भाकर

         माझे घर जाते सावरून'


परप्रांतातून हिकडे येऊन स्थायिक झालेल्या कुटुंबातली ही मुलं. घरच्या हलाखीच्या परिस्थितीमुळे डगमगून न जाता, उन वारा पाऊस यांची तमा न बाळगता आपल्या कुटुंबासाठी मेहनत करतायत. ह्यांची अखंड दिवसाची कमाई साधारण 150ते 200 रुपये पण इतक्याच किमतीचा ह्यांच्या कुटुंबाला आधार होतोय. आपण म्हणताना सहज म्हणून जातो "मुल ऐतखाऊ असतात" पण कुटुंबाची जवाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेऊन मेहनत करणारे ही काही मुलं असतात. मग त्यांना दुर्लक्षित म्हणा किंवा उपेक्षित.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा