Breakingकोल्हापूर : ग्रामस्तरावरील कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन भत्ता आदा करा - राजेंद्र सुर्यवंशी


कसबा बीड ग्रामपंचायतीकडून प्रोत्साहन भत्ता वाटप


कोल्हापूर (यश रुकडीकर) : करवीर तालुक्यातील कसबा बीड येथील ग्रामपंचायतीकडून जिल्हा परिषद कोल्हापूरचे मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्या आदेशानुसार ग्रामस्तरावरील अंगणवाडी सेविका, ग्रामपंचायतीचे कर्मचारी, आशा वर्कर्स यांना 2000 रुपये मानधन प्रोत्साहनपर भत्ता वाटप करण्यात आला. करवीर पंचायत समितीचे माजी सभापती राजेंद्र सुर्यवंशी यांच्या उपस्थित हा कार्यक्रम पार पडला.

या प्रसंगी राजेंद्र सुर्यवंशी म्हणाले, ग्रामस्तरावरील कर्मचारी कोरोना संसर्गजन्य रोगाच्या कार्य काळामध्ये स्वतःच्या आरोग्याची काळजी घेत, प्रसंगी जीव धोक्यात घालून काम करतात. ग्रामपंचायत पदाधिकारी, सर्व सदस्य, कोरोना दक्षता समिती यांच्या मार्गदर्शनाखाली घर टू घर जाऊन सर्वे करत आपले कर्तव्य चोख पद्धतीने अंगणवाडी सेविका व आशा वर्कर्स बजावत असतात. त्यांच्या या कार्याची प्रशंसा जेवढी करावी तेवढी कमीच आहे. 

या कार्यक्रमास ग्रामपंचायतीचे सरपंच सर्जेराव तिबिले, उपसरपंच वैशाली सुर्यवंशी, माजी संचालक गोकुळ दूध संघ व माजी सरपंच सत्यजित पाटील, ग्रामसेवक संदीप पाटील, शामराव सुर्यवंशी, दिनकर सुर्यवंशी तसेच ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य, कर्मचारी वर्ग, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर्स आदी उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा