Breaking
कोल्हापूर : सातबारा व प्रॉपर्टी कार्ड ऑनलाईन तसेच ऑफलाईन मिळावे - कोल्हापूर जिल्हा नागरी कृती समितीकोल्हापूर, दि. २१ : सातबारा व प्रॉपर्टी कार्ड ऑनलाईन तसेच ऑफलाईन मिळावे, अशी मागणी कोल्हापूर जिल्हा नागरी कृती समितीच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.


निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्र राज्यामध्ये शासनाने प्रॉपर्टी कार्ड व सातबारा उतारे घरबसल्या ऑनलाईन उपलब्धतेची सेवा सुरू केली आहे, ती स्वागतार्थ ही आहे. परंतु महाराष्ट्राची भौगोलिक परिस्थिती पाहता त्याच बरोबर इंटरनेट सुविधा ची परिस्थिती ही अतिशय ढिसाळ असल्याने त्याचा उपयोग सर्वसामान्य लोकांना इंटरनेट सुविधा उपलब्ध होत नसल्याने याचा फायदा त्यांना होत  नसल्याचा दिसतो आहे. त्याच बरोबर नागरी सुविधा केंद्रावर  सामान्य नागरिकांची शासनाची फी वजा जादाची रक्कम स्वीकारून आर्थिक पिळवणूक होत आहे आणि त्यांच्यावर कुठली नियंत्रण दिसत नाही. त्यामुळे राज्यामध्ये तसेच कोल्हापूर जिल्ह्यात व शहरामध्ये ऑनलाईन सातबारा व प्रॉपर्टी कार्ड मिळकत धारिका ऑनलाइन  देण्याची सोय केली आहे. 


परंतु सर्वच लोकांना ऑनलाईन सातबारे व प्रॉपर्टी कार्ड  काढता येते असे नाही तरी पूर्वी प्रमाणे तलाठी कार्यालयामध्ये व सिटी सर्वे ऑफिसमध्येही सदर सातबारे व प्रॉपर्टी कार्ड देण्याची ऑफलाइन पद्धतीची सोय पूर्वीप्रमाणेच चालू ठेवावी. त्यामुळे सामान्य नागरिकांची आर्थिक व मानसिक पिळवणूक होणार नाही. असे निवेदनात म्हटले आहे.


निवेदनावर कोल्हापूर शहर व जिल्हा नागरी कृती समिती चे अशोक पोवार, रमेश मोरे, अजित सासणे, भाऊ घोडके, प्रमोद पंगावकर, चंद्रकांत पाटील, महेश जाधव, पप्पू सुर्वे, राजेश वरक, दादा लाड, लहुजी शिंदे यांची नावे आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा