Breaking

लातूर : किसान संघर्ष समिती तर्फे शेतकरी कायद्याची होळी !


लातूर : किसान संघर्ष समिती,लातूर च्या वतीने भाजपच्या मोदी सरकारने एक वर्षापूर्वी कोणत्याही शेतकरी संघटनांशी व राज्य सरकारांशी चर्चा न करता ५ जून २०२० रोजी तीन वटहुकूम काढले व १७ आॕगस्ट, ९ सप्टेंबर व ११ सप्टेंबर रोजी त्याचा कायदा होण्यासाठी ते लोकसभेसमोर मांडून मंजूर करुन घेतले. त्या कायद्याची आज होळी करण्यात आली.


शेतकरी कयदे १९ व २० सप्टेंबर दरम्यान राजसभेसमोर मांडून मंजूर केले आणि २७ व २८ सप्टेंबरच्या दरम्यान राष्ट्रपती यांची सही होऊन आता त्याचे कायद्यात रुपांतर झाले ५ जून २०२० या वटहुकूम निघाल्याच्या तारखेपासून कायदा अंमलात आला आहे. या तीन शेतकरी विरोधी कायद्यांच्या विरोधात दिल्ली च्या सिमेवर लाखो शेतकरी सहा महिन्यापासून ठाण मांडून बसले असताना आणि अनेक शेतकरी बांधवांनी आपला जीव गमावला असताना सुद्धा मोदी सरकार हे तीन शेतकरी विरोधी कायदे रद्द न करता केवळ अदानी, अंबानी, बडे भांडवलदार यांच्या फायद्यासाठी धोरणे राबवत आहे, अशी टिका यावेळी करण्यात आली.


शेतकऱ्यांचा कोणताही विचार न करता शेती व्यवस्था  मोडीत काढून शेतकऱ्यांना देशोधडीला लावत आहे, असा आरोप करत आज किसान संघर्ष समन्वय समिती च्या वतीने मोदी सरकारच्या शेतकरी धोरणांच्या विरोधातील कायद्यांचे दहन करुन होळी करण्यात आली.

यावेळी अॕड.भाई उदय गवारे, भाई प्रा.दत्ता सोमवंशी, कॉम्रेड सुधाकर शिंदे, कॉम्रेड संजय मोरे, अॕड.भाई सुशील सोमवंशी, कॉम्रेड विश्वभंर भोसले, अॕड.भाई भालचंद्र कवठेकर, अॕड.विजय जाधव, कॉम्रेड विक्रम गिरी, कॉम्रेड कातळे, अशोक गायकवाड, डी.पी.कांबळे, सुनील मंदाडे, इल्यास शेख, शैलेश सरवदे हे उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा