Breaking


पवारांच्या ठाकरे सरकारची गत ‘यडं पेरलं अन खुळ उगवलं' आमदार गोपीचंद पडळकर यांची टीकामुंबई : राज्य सरकारने जाहीर केलेल्या ‘कोरोनामुक्त गाव’ स्पर्धेवर भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी टीका केली आहे. “आघाडी सरकारच्या नावाखाली शरद पवारांनी ‘येडं पेरलं अन् खुळं उगवलं’ अशी गत ठाकरे सरकारची झाली आहे. तसेच कोरोना मुक्त गाव ही योजना फसवी असल्याचे त्यांनी म्हंटले आहे.


ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा कोरोना आणि लॅाकडाऊनमुळे पूर्णपणे मोडला आहे. घरातील कित्येक कर्ती माणसं मृत्यूमुखी पडलीत. यांचे अश्रू पुसण्याऐवजी तुम्हाला ग्रामीण जनतेच्या दु:खाची थट्टा करणारी स्पर्धा सुचत असल्याची टीका, गोपीचंद पडळकर यांनी केली आहे.


खरंतर या ५० लाखांच्या बक्षीसांबद्दलही मला साशंकता आहे. कारण कोरोनामुळे मृत्यू झालेल्या पत्रकारांना जीआर काढून सुद्धा एक रुपयाचीही मदत केली नाही, त्यामुळे कोरोनामुक्त गाव बक्षीस योजना म्हणजे हा एक भुलथापा मालिकेचा भाग असल्याचे म्हंटले आहे, तसेच या योजनेच्या व्यवस्थापनेसाठी निधी कोण देणार? आणि सगळंच गाव करील तर सरकार काय करणार असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा