Breaking


मंचर : इंगळुन येथील जीप गाडीचा भीषण अपघात, एकाचा जागीच मृत्यूमंचर : कळंब (ता. आंबेगाव) जवळ पुणे नाशिक महामार्गावर जीप गाडी आणि आयशर ट्रकचा भीषण अपघात झाल्याची घटना आज सकाळी (ता.१५) घडली. या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून इतर जखमी झाले आहेत.


ही जीप जुन्नर तालुक्यातील इंगळुन येथील असून या आदिवासी भागातील तरुण मंचर येथील गोवर्धन दूध डेअरी मध्ये नेहमी प्रमाणे कामावर गेले होते, सकाळी सुट्टी झाल्यावर लेबर घेऊन घरी येत असताना हा भीषण अपघात झाला. या जीप गाडीमध्ये एकूण १८ कामगार होते, या अपघातात इंगळुन येथील गाडी चालक संतोष डोळस (वय अंदाजे ३४) यांचा जागीच मृत्यू झाला, तर ३ जण गंभीर जखमी झाले आणि इतरांना किरकोळ जखम झाली आहे.


अपघात झाल्यानंतर गंभीर जखमींना तात्काळ पुण्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा