Breaking



मनोज पावरा यांची बिरसा फायटर्सच्या महाराष्ट्र राज्याध्यक्ष पदी निवड, कार्यकारिणी जाहीर !



धुळे : मनोज पावरा यांची बिरसा फायटर्सच्या महाराष्ट्र राज्याध्यक्ष पदी निवड  करण्यात आली आहे.सुशिलकुमार पावरा संस्थापक अध्यक्ष बिरसा फायटर्स यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 24 जून 2021 रोजी बिरसा फायटर्स महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी विस्तार व विदर्भ-पुणे विभागातील नवीन शाखा पदग्रहण सोहळासाठी  झूम सभा आयोजित करण्यात आली होती.या सभेत मनोज पावरा यांची राज्याध्यक्ष  पदी निवड केल्याची  घोषणा  सुशिलकुमार पावरा संस्थापक अध्यक्ष बिरसा फायटर्स  यांनी केली.


महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी पुढीलप्रमाणे पुढीलप्रमाणे : 


राज्याध्यक्ष मनोज पावरा, उपाध्यक्ष राजेश धुर्वे, महासचिव राजेंद्र पाडवी, महानिरीक्षक केशव पवार, कार्याध्यक्ष नंदलाल पाडवी, कोषाध्यक्ष दादाजी बागूल, राज्य प्रवक्ता रोहित पावरा,सल्लागार अॅड.जगदीश पावरा, अॅड.रमेश पावरा, अॅड.सतीश नाईक, महिला प्रतिनिधी श्रीम.चंद्रभागा पवार, संघटक ज्ञानेश्वर बर्डे, प्रसिद्धी प्रमुख हसन तडवी, राज्य सदस्य मनोहर पाडवी, देवीदास वसावे, अशोक वळवी, जहांगीर पावरा, अर्जून जाधव याप्रमाणे महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी निवड करण्यात आली आहे. 


या सभेत महाराष्ट्र राज्यकार्यकारणी सोबतच बिरसा फायटर्स पुणे विभागातील काही नवीन जिल्हा शाखा व तालुका शाखा व गाव शाखा निवड करून जाहीर करण्यात आल्या. 


आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी व आदिवासी समाजाच्या समस्या सोडविण्यासाठी कायदेशीर व नियोजनबद्ध लढाई आपण सगळ्यांनी लढू या. चांगले सामाजिक काम करण्यासाठी सर्व पदाधिकारी यांनी कामांची वाटणी करून घेवूया. नेहमी प्रमाणे उत्साहाने कामाला लागू या. अशी प्रतिक्रिया नवनिर्वाचित राज्याध्यक्ष मनोज पावरा यांनी व्यक्त केली.   


मनोज पावरा यांची बिरसा फायटर्सच्या राज्याध्यक्ष  पदी निवड झाल्याबद्धल उपस्थित पदाधिकारी यांनी अभिनंदन केले आहे व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा