Breaking


मराठा आंदोलन : संभाजीराजे यांच्या नेतृत्वात मराठा आंदोलनाला आज पासून सुरुवात, प्रकाश आंबेडकर ही होणार सहभागीकोल्हापूर : ६ जून रोजी रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा संपन्न झाल्यावर खासदार संभाजीराजे यांनी मराठा आरक्षणावर आपली भूमिका मांडली होती. तसेच १६ जूनपासून मराठा आंदोलनाची हाक देण्यात आली होती, या पार्श्वभूमीवर आज पासून पुन्हा एकदा राज्यात मराठा मोर्चाला सुरुवात होते आहे.


कोल्हापुरातील राजर्षी शाहू महाराजांच्या समाधीपासून मराठा आरक्षणासाठी खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या नेतृ्त्वात मूक मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चा मध्ये आमदार, खासदारांनी देखील सहभागी होण्याचे आवाहन संभाजीराजेंनी केले आहे.


आंदोलनात सहभागी होण्याच्या छत्रपती संभाजीराजेंच्या आवाहनाला वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी ही प्रतिसाद दिला आहे. आजच्या कोल्हापुरातील मराठा मोर्चात प्रकाश आंबेडकरही सहभागी होणार आहेत.


दरम्यान, खासदार संभाजी राजे यांनी काल बोलताना म्हणाले होते की, आंदोलनात सहभागी होणारे लोकप्रतिनिधी आपल्यासाठी येणार असल्याने आपणही त्यांना सन्मानपूर्वक वागणूक द्यायची. उद्या त्यांना कोणीही बोलायचं नाही, उलट-सुलट प्रश्न विचारायचे नाहीत. माझ्यासह आपण सर्वांनी मौन राखायचं आहे. आंदोलनासाठी येणाऱ्या लोकप्रतिनिधींना हवं तेवढा वेळ बोलू द्या. पण त्यांनी येणं महत्त्वाचं आहे. मला विश्वास आहे ते सर्वजण येतील.”, असं खासदार संभाजीराजे छत्रपती म्हणाले होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा