Breaking


अंबाजोगाईत महागाईच्या विरोधात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने उपजिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने



अंबाजोगाई : महागाईच्या विरोधात अंबाजोगाई मध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने आज निदर्शने करण्यात आली. अच्छे दिनचे स्वप्न दाखवुन सत्तेवर आलेल्या मोदी सरकारने सत्तारूढ झाल्यानंतर मात्र सर्वसामान्य जनतेचे पेट्रोल, डिझेलची भाववाढ करून कंबरडे मोडले आहे. पेट्रोल, डिझेलने शंभरी गाठली आहे. या भाववाढीचा सर्व जीवनवाश्यक वस्तुवर परिणाम होऊन त्यांचे भाव गगणाला भिडले आहेत. खाद्यतेलाचे भाव 200 रूपयांच्या घरात जाऊन पोहचले आहेत, या विरोधात माकपच्या वतीने निदर्शने करण्यात आली.


गरीब, कष्टकरी जनतेला कोरोना महामारीच्या पार्श्वभुमीवर कोणताही रोजगार उपलब्ध नव्हता, त्यातही प्रंचंड महागाईमुळे जनता मेटाकुटीला आली आहे त्यामुळे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने सरकारच्या जनता विरोधी धोरणाच्या विरोधात आज देशभर निदर्शने करण्यात आली.


या मागण्या करण्यात आल्या


- पेट्रोल डिझेलची भाववाढ तात्काळ मागे घेण्यात यावी.

- जीवनावश्यक वस्त़ुची महागाई मागे घेण्यात यावी.

- दिल्ली येथे केंद्र सरकारने शेतकरी विरोधी कायदयाच्या विरोधात आंदोलन चालू आहे, तरी शेतकरी विरोधी कायदे तात्काळ मागे घ्या.

- आशा सेविकांना आरोग्य खात्यात कायम नेमणुक देण्यात यावी तसेच किमान वेतन तात्काळ देण्यात यावे.

- बांधकाम कामगारांचे नोंदणी कार्यालय अंबेजोगाई येथे सुरू करावे. 

- अस्मिता ओहाळच्या अट्रोसिटीचा पारदर्शक तपास करून तिला न्याय द्या व दोषी अधिकाऱ्यावर कारवाई करा.


यावेळी बब्रुवाहन पोटभरे, अजय बुरांडे, प्रशांत मस्के,  सुहास चंदनशिव, किर्ती कुंठे, धीरज वाघमारे, राहुल धोतरे, सुमित आवाडे, सचिन टिळक, जगन्नाथ  पाटोळे, अशोक शेरकर, महेश देशमुख आदी कार्यकर्ते उपस्थित होते

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा