Breaking



कोरोनामुळे अनुपस्थित राहणाऱ्यांना पुन्हा परीक्षेची संधी देणार - वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख



मुंबई : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत घेण्यात येणाऱ्या हिवाळी २०२० परीक्षा येत्या १० जून पासून सुरू होणार आहेत. या परीक्षांना बसणाऱ्या विद्यार्थ्यांची कोविड चाचणी पॉझिटिव्ह असल्यास परीक्षेस अनुपस्थित राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विशेष परीक्षा घेण्यात येणार आहे. अशी माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी दिली.


कोरोनाच्या परिस्थितीच्या अनुषंगाने, विद्यार्थी दि. १० जून २०२१ पासून सुरु होणाऱ्या विद्यापीठाच्या हिवाळी-२०२० लेखी परीक्षेस कोरोनाच्या आजाराचा अहवाल (Positive) आल्यामुळे अनुपस्थित राहतील, अशा विद्यार्थ्यांची सदर हिवाळी - २०२० लेखी व प्रात्यक्षिक परीक्षा झाल्यानंतर, विशेष परीक्षा घेण्यात येईल. सदरील परीक्षेसाठी अनुपस्थित असलेल्यांचा प्रयत्न (Attempt) ग्राह्य धरला जाणार नाही असा निर्णय विद्यापीठाच्या परीक्षा मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. तसेच विशेष परीक्षेचा दिनांक यथावकाश जाहीर करण्यात येईल.


या वैद्यकीय परीक्षेस बसणारे विद्यार्थी परीक्षेचे प्रवेशपत्र घेऊन कोणत्याही शासकीय रुग्णालय तसेच शासनमान्य कोविड रुग्णालयात स्वतःची आरटीपीसीआर चाचणी विनामूल्य करून घेऊ शकतात, तसेच जे विद्यार्थी वैद्यकीय महाविद्यालयातील वसतिगृहात राहण्यास इच्छुक आहेत अशा विद्यार्थ्यांची वसतिगृहात वैयक्तिक अंतर राखून राहण्याची सोय करण्यात यावी, वसतिगृहाच्या मेस मध्ये भोजनाची सोय करण्यात यावी. वसतिगृहाची स्वच्छता व निर्जंतुकीकरण वेळोवेळी करण्यात यावे आणि सर्व प्रकारची काळजी घेऊनच वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेण्यात याव्यात, अशा ही सूचना वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठातांना देण्यात आल्या आहेत.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा