Breaking
वांगणसुळे येथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी लसीकरणा विषयी गैरसमज केले दूर, नागरिकांनी दिला लसीकरणाला प्रतिसादसुरगाणा (दौलत चौधरी) : अतिदुर्गम भागातील वांगण सुळे येथील तरुण बांधवा मध्ये कोरोना लसी विषयी अनेक समज गैरसमज निर्माण झाल्याने भीतीदायक वातावरण निर्माण झाले होते. आदिवासींच्या मनातील भीती दुर करण्यासाठी पळसन येथील आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी कमलाकर जाधव यांनी आदिवासी भाषेत मार्गदर्शन केले. त्यानंतर गावातील तरुणांनी दिवस भरात मोठ्या प्रमाणात उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला, यावेळी दिवसभरात ३० तरूणांनी कोव्हीशिल्ड लस घेतली.


लसीकरणाच्या होत असलेल्या कँम्प मध्ये वांगण सुळे येथील ३० बांधवांनी प्रतिसाद देत लस घेतली. या गावात पळसन प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. कमलाकर जाधव, धूम सिस्टर तसेच गावची अंगणवाडी सेविका निर्मला टोपले, आशा विमल पेटार, यांचे सहकार्य लाभले. यावेळी गावातील तरुण शिवराम टोपले, गणेश चौधरी, सुनिल टोपले, शांताराम चौधरी, विनायक जाधव, श्याम धूम, नामदेव लोखंडे आदी व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा