Breaking


आशा व गटप्रवर्तक संपावर मंत्रालयात आज बैठक; सिटूचे राष्ट्रीय उपाध्यक्ष उपस्थित राहणार !


मुंबई, दि. १६ : आशा व गटप्रवर्तकांनी काल (दि.१५) पासून राज्यव्यापी बेमुदत संप पुकारला आहे. विविध मागण्यांसाठी आशा व गटप्रवर्तक हा संप करत असून संपाअगोदरची बैठक निष्फळ ठरली होती. आज (दि. १६) ११. वाजता मंत्रालयात आरोग्य मंत्री राजेश टोपे आणि आशा व गटप्रवर्तक कृती समितीची बैठक संपन्न होणार आहे. त्या बैठकीस सिटूचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व राज्य अध्यक्ष डॉ. डी. एल. कराड उपस्थित राहणार आहे.


डॉ. कराड म्हणाले की, काल पासून राज्यातील सुमारे 70 हजार आशा कर्मचारी व गटप्रवर्तक बेमुदत संपावर आहेत. अत्यंत अल्प मोबदल्यात त्यांच्याकडून काम करून घेतले जाते. आशा कर्मचारी व गटप्रवर्तक यांना सरकारी कर्मचार्‍यांचा दर्जा द्यावा, तोपर्यंत 18 हजार रुपये किमान वेतन आशांना दरमहा 18,000 रुपये, गटप्रवर्तकांना दरमहा 22,000 रुपये याप्रमाणे किमान वेतन मिळावे व कोविड महामारीत केलेल्या कामासाठी प्रोत्साहन भत्ता शहरी व ग्रामीण भागातील आशा आणि गटप्रवर्तक यांना मिळावा, निश्चित मानधनात या काळात कपात करण्यात आली आहे ती परत द्यावी, सर्व मोबदल्याच्या थकीत रकमा तातडीने अदा करण्यात याव्यात, आशा कर्मचाऱ्यांना आरोग्य सेवेत भरती करताना प्राधान्य देण्यात यावे या मागण्यांसाठी हा संप आहे .

आज सकाळी 11 वाजता मंत्रालयात राज्याचे आरोग्य मंत्री माननीय राजेश टोपे यांनी संपाच्या प्रकरणी तोडगा काढण्यासाठी बैठक बोलावली आहे.  सीटू व आशा व गटप्रवर्तक कृती समितीच्या वतीने अन्य  नेत्यांसमवेत बैठकीत होईल. 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा