Breaking
मुंबई : शिवसेनेच्या ५५ व्या वर्धापनदिनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी साधला शिवसैनिकांनी संवाद, काय म्हणाले पहा !मुंबई : शिवसेनेच्या ५५ व्या वर्धापनदिनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून शिवसैनिकांशी संवाद साधला. 


उद्धव ठाकरेंच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे -


- गेल्या ५५ वर्षात शिवसेनेनं अनेकांचं रंगही पाहिल आणि अंतरंगही पाहिलेत, सत्ता न मिळाल्यानं अनेकांचा जीव कासावीस होतोय.


- मराठी म्हणणं जसं कमीपणाचं लक्षण होतं, तसं हिंदुत्त्वाचा उच्चार करतानाही भल्याभल्यांना कापरं भरत होतं, तेव्हा शिवसेना म्हणाली, गर्व से कहो हम हिंदू है


- स्वबळ केवळ निवडणुका लढवण्यासाठी असू नये, स्वबळ हे अभिमानाचं आणि स्वाभिमानाचं असावं आणि स्वबळ हा नारा नाही, आमचा अधिकार आहे, न्याय-हक्कांसाठी स्वबळ हवं, केवळ निवडणुकीसाठी नको- हिंदुत्त्व आमचं राष्ट्रीयत्व आहे, हे लक्षात घ्या


- एक देश आणि अनेक भाषा असं जगाच्या पाठीवर आपण एकमेव आहोत, एकत्रीकरण ही भारताची ताकद आहे.


- देशावर प्रेम करा सांगणारा शिवसेनेशिवाय दुसरा पक्ष नाही


- विकृत राजकारण केलं तर देशाच खरं नाही


- शिवसेनेनं महाविकास आघाडी केल्यानं हिंदुत्त्व सोडलं का? हिंदुत्त्व म्हणजे पेटंट आहे का? हिंदुत्त्व नेसण्याची-सोडण्याची वस्तू नाहीय. हिंदुत्त्व हृदयात आहे.


- कोरोनाच्या काळात स्वत:च्या जीवाची पर्वा न करता हजारो शिवसैनिकांनी रक्तदान केलं, आमचं रक्त लाल ज्यांना गरज त्यांना दिले जाते 


- सत्तेसाठी आपण लाचार होणार नाही


- स्वबळावर सत्ता आणू कुणी बोललं तर लोक जोड्यानं मारतील

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा