Breakingनागपूर : अमृत" संस्थेला लवकर सुरू करण्याची आम आदमी पार्टीची मागणी


नागपूर : बार्टी, सारथी, महाज्योती च्या धर्तीवर समाजातील आर्थिक दुर्बल विद्यार्थ्यांसाठी युवकांसाठी 'अमृत' संस्थेला लवकर सुरू करण्याबाबत नागपूर पदवीधर संघाचे विधान परिषद आमदार अभिजित वंजारी यांना आम आदमी पार्टी युवा आघाडी च्या वतीने निवेदन देेण्यात आले.


सविस्तर वृत असे की,  20 ऑगस्ट 2019, मंत्रिमंडळातील बैठकीत बार्टी, सारथी, महाज्योती या संस्थांच्या धर्तीवरखुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील युवक, युवती व इतर उमेदवारांसाठी विविध उपक्रम, कार्यक्रम, राबवून विद्यार्थी, युवक, युवती इत्यादींचा विकास घडवण्यासाठी "महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधनी" (अमृत).ही संस्था स्थापन करण्यास मान्यता देण्यात आली होती.

22 ऑगस्ट 2019 च्या शासन निर्णयान्वये महाराष्ट्रातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांच्या(EWS) विकासासाठी अमृत या स्वायत्त संस्थेची नोंदणी कंपनी कायदा 2013 अंतर्गत नियम 8 अन्वये करण्यास मान्यता देण्यात आली होती. व सदर संस्था स्थापन व कार्यान्वित करण्याचे अधिकार बहुजन कल्याण मंत्री यांना देण्यात आले होते.

महाराष्ट्रातील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, मराठा-कुणबी, इतर मागासवर्ग- विमुक्त जाती भटक्या जमाती-विशेष मागास प्रवर्ग या समाजातील घटकांच्या विकासासाठी अनुक्रमे बार्टी, सारथी, तारती(TRTI), व महाज्योती या संस्था आहेत. परंतु आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांसाठी अशाप्रकारची कुठलीही संस्था सध्या अस्तित्वात नाही. तेव्हा 20 ऑगस्ट 2019 च्या मंत्रिमंडळातील बैठकीनुसार व 22 ऑगस्ट 2019 च्या शासननिर्णयानुसार स्थापन झालेल्या "अमृत" या संस्थेस कार्यान्वित करून EWS या घटकाला उपकृत करावे ही महत्वाची मागणी घेऊन आम आदमी पार्टी युवा आघाडी राज्य समिती सदस्या कृतल वेळेकर आकरे यांच्या नेतृत्वात देण्यात आले.

यावेळी आप युवा आघाडी विदर्भ संयोजक पियुष आकरे, नागपूर शहर अध्यक्ष गिरीश तितरमारे, सचिव प्रतीक बावनकर उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा