Breaking


नांदेड : जनतेच्या ज्वलंत प्रश्नावर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलननांदेड, दि. १७ :  मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने दि.17 जून रोजी राज्यव्यापी आंदोलनाची हाक दिली होती. त्या निमित्ताने नांदेड शहर समितीच्या वतीने चार तास धरणे आंदोलन करीत मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी देत केंद्र आणि राज्य सरकारचा निषेध व्यक्त केला आहे.


आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने घरेलू कामगार महिला व आशा वर्कर सहभागी झाल्या होत्या. आंदोलनाचे नेतृत्व माकप राज्य सचिव मंडळ सदस्य कॉ.विजय गाभणे, नांदेड शहर सचिव कॉ.गंगाधर गायकवाड यांनी केले.


अच्छे दिनचे स्वप्न दाखवुन सत्तेवर आलेल्या मोदी सरकारने सत्तारूढ झाल्यानंतर मात्र सर्वसामान्य जनतेचे पेट्रोल, डिझेलची भाववाढ करून कंबरडे मोडले आहे. पेट्रोल, डिझेलची शंभरी गाठली आहे.या भाववाढीचा सर्व जीवनवाश्यक वस्तुवर परिणाम होऊन त्यांचे भाव गगणाला भिडले आहेत. खाद्यतेलाचे भाव 200 रूपयांच्या घरात जाऊन पोहचले आहेत.


यामुळे गरीब, कष्टकरी जनतेला कोरोना महामारीच्या पार्श्वभुमीवर कोणताही रोजगार उपलब्ध नव्हता, त्यातही प्रंचंड महागाईमुळे जनता मेटाकुटीला आली आहे. मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीतर्फ सरकारच्या जनताविरोधी धोरणाच्या विरोधात आज देशभर निदर्शने करण्यात आली. यावेळी विविध मागण्याचे निवेदन जिल्हाधिकारी नांदेड यांना देण्यात आले. घरेलू कामगारांना राज्य सरकारने सानुग्रह अनुदान स्वरूपात दीड हजार रूपये मंजूर केले असून सरसकट घरकाम करणाऱ्या कामगारांना देण्याच्या मार्गदर्शक सूचना राज्य सरकारच्या आहेत परंतु सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयात पुरेसे मनुष्यबळ नसल्यामुळे घरेलू कामगारांची नोंदणी व नुतणीकरण करण्यास विलंब होत आहे. त्यामुळे कामगार कार्यालयात तात्काळ विशेष कक्ष स्थापन करून घरेलू कामगारांची नोंदणी करून घ्यावी व ज्या कामगारांने घरमालकाचे हमी पत्र व बँक पासबुक, आधार कार्ड या कागदपत्राची पूर्तता केली आहे त्यांना विनाविलंब शासकीय अनुदानाचा लाभ देण्यात यावा तसेच पेंशन योजनेसह सर्व योजना लागू करून अमलबजावणी करावी. आशा व गट प्रवर्तकांना विनामोबदला काम लावू नये व दि.15 जून पासून आशांचा बेमुद्दत संप सुरू असल्यामुळे त्यांना कामकरण्यास दबाव आणू नये. असे कुणी केल्यास संबधितावर कारवाई करावी. रेल्वे सफाई कामगार अनुराधा अशोक परसोडे यांनी पो.स्टे.वजिराबाद नांदेड येथे अॕट्रॉसीटी व इतर कलमान्वये गुन्हे दाखल केले आहेत त्या गुन्ह्यातील मुख्य आरोपी आर.मंगाचार्यलू व एस.के.वल्ली यांची नावे तत्कालीन उप विभागीय पोलिस अधिकारी यांनी दोषारोप पत्रातून कमी केली आहेत ती पूर्ववत समाविष्ट करून संबंधित तपास अधिकाऱ्यांना सहआरोपी करावे. व पिडितेस समाज कल्याण विभागा मार्फत मिळणारी आर्थिक मदत तातडीने करावी.नांदेड येथील उप प्रादेशिक अधिकारी अविनाश राऊत हे कर्तव्यात कसूर करणारे व भ्रष्ट मार्गाने मालमत्ता जमविणारे अधिकारी असल्यामुळे त्यांची व त्यांच्या रक्ताच्या नातेवाईकांची सीबीआय व केंद्रीय सडक परिवहन सडक मार्ग मंत्रालय नवी दिल्ली मार्फत उच्चस्तरीय चौकशी करून खातेनिहाय चौकशी करून कठोर कारवाई करावी. आरटीओ नांदेड कार्यालयातील दलाली करणाऱ्यांचे अवैध काउंटर बंद करावे व एकाच ठिकाणी तीन वर्षापेक्षा जास्त काळ सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांची, अधिकाऱ्यांची तात्काळ बदली करावी. स्वारातीम विद्यापीठातील सफाई कामगारांना कायम सेवेत समाविष्ट करावे. वजिराबाद सर्वे नंबर 56 बी मधील पिडिता जमीन मालक अल्का गुल्हाने यांच्या जमिनीचे मुल्यांकन देण्यात यावे व त्यांचा राहिलेला मावेजा अदा करावा. नांदेड शहरातील बजरंग कॉलनी तील दलित कुटुंबातील सदस्यांनी मागील दहा वर्षापासून रस्ता, नाल्या व ड्रेनेज सुविधा मिळाव्यात म्हणून अनेक आंदोलने केली आहेत. त्यांना मनपाने शकडोवेळा आश्वासनाचे पत्र दिले परंतु कारवाई केली नाही म्हणून त्या पत्र काढणा-या सहाय्यक आयुक्तावर, कार्यकारी अभियंत्यावर अॕट्रॉसीटी ॲक्ट कायद्याने कारवाई करावी. माहूर येथील श्री रेणुका देवी संस्थान येथे सीटूचे कर्मचारी युनिट असून त्या सर्व कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करून वेतन श्रेणी निश्चित करावी. गरजू व बेरोजगार तरूणांना बँकेने कर्जपुरवठा करावा आदी स्थानिक मागण्या करण्यात आल्या आहेत.


पेट्रोल डिझेलची भाववाढ तात्काळ मागे घेण्यात यावी. जीवनावश्यक वस्त़ुची महागाई मागे घेण्यात  यावी. दिल्ली येथे केंद्र सरकारने शेतकरी विरोधी कायदयाच्या विरोधात आंदोलन चालू आहे , तरी शेतकरी विरोधी व कामगार विरोधी कायदे तात्काळ मागे घ्यावेत या मागण्या केंद्र सरकारकडे करण्यात आल्या आहेत.


आंदोलन यशस्वी करण्यासाठी सीटू संलग्न घरकामगार संघटनेच्या कार्याध्यक्ष कॉ.करवंदा गायकवाड, कॉ.मारोती केंद्रे, कॉ.संगिता जोंधळे, कॉ.शेख मगदूम पाशा, कॉ.शरयू कुलकर्णी, कॉ.द्रोपदा पाटील, मिनाक्षी शहा, रेखा धूतडे, माधूरी भटलाडे, ज्योती कोल्हे, गंगा घाटे आदींनी प्रयत्न केले. तर डीवायएफआयचे जिल्हा अध्यक्ष कॉ.अंकुश माचेवाड यांनी आंदोलनास पाठिंबा दिला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा