Breakingअक्कलकोट मध्ये नवदाम्पत्यानां वडाचे रोप भेट देऊन वटपौर्णिमा साजरी ; सर्पाविषयी जनजागृती

 


अक्कलकोट : येथील महात्मा बसवेश्वर विवेक वाहिनीच्या वतीने अक्कलकोट शहरात चालू वर्षभरात लग्न झालेल्या १०१ नवदाम्पत्यानां वडाचे रोप भेट देऊन वटपौर्णिमा साजरी करण्यात आली. विवेक वाहिनीचे प्रमुख स्वामींनाथ हरवाळकर यांच्या पुढाकाराने हा उपक्रम राबविण्यात आला.


स्वामींनाथ हरवाळकर यांनी वडाची फांदी तोडून नव्हे पुढच्या पिढीसाठी ऑक्सिजन ठेऊन पर्यावरण पूरक वटपौर्णिमा साजरी करण्याचे आवाहन केले होते, त्यास महिला वर्गानी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.पुढे बोलताना हरवाळकर म्हणाले अंधश्रद्धा टाळून सर्व सावित्रीच्या लेकीनी ऑक्सिजन, हृदय आणि दीर्घायुषी होण्यासाठी वटवृक्ष जगवणे महत्वाचे असल्याचे प्रतिपादन करून वडाचे झाड आपल्या अंगणात, परसबागेत, शेतात पूर्ण जगविण्याचे त्यांनी आवाहनही केले. सकाळी ९ वाजता नवीन राजवाडा, ११ वाजता स्टेशन रोड, दुपारी एक वाजता अंबाबाई मंदिर येथे वटवृक्षाचे मोफत वाटप करण्यात आले.


सध्या पावसाळी दिवस असल्याने घरात सापांचा वावर होऊ शकतो अशावेळी माता भगिनींनी घाबरून त्यांची हत्या करू नये, यासाठी विषारी बिन विषारी सापांची माहिती स्वामींनाथ हरवाळकर यांनी महिलांना करून दिली. या कामी सर्पमित्र नागेश उमदी, शरणू अलोळी, सिकंदर चाऊस यांनी नाग, धामिण या सर्प महिलांना हाताळण्यास दिले. त्यानंतर सर्व सर्प नागेश उमदी यांनी निर्जनस्थळी सोडून दिले. यावेळी महिलावर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा