Breakingपिंपरी चिंचवड : महावितरणाच्या कार्यालयास टाळे ठोकण्याचा नगरसेविका अश्विनी जाधव यांचा इशारा

  


चिखली : प्रभाग क्र.2 जाधववाडी, राजेशिवाजी नगर, मोशी परिसरात वारंवार वीज पुरवठा खंडित होतो आहे. विद्यमान नगरसेविका अश्विनी जाधव आणि सामाजिक कार्यकर्ते संतोष जाधव यांनी 7 मे रोजी  मोशी चिखली महावितरण कार्यालय अधिकारी रमेश सुळ निवेदन दिले. खंडित वीज पुरावठयामुळे वर्क फ्रॉम होम कर्मचारी, व्यापारी, वर्कशॉप याचे नुकसान होत असल्याचेही म्हटले आहे.


तसेच प्रभागातील सोसायट्यांचा पाणी उपसा वेळेवर होत नाही. त्यामुळे महावितरण ने सेवा सुधारावी अशी मागणी केली होती.

 

परंतु पंतनगर कॉलनी क्र. १ मध्ये काल (20 जून) रात्रीपासून लाईट नसल्यामुळे नागरिक हैराण झाल्यामुळे नागरिकांनी नगरसेविका अश्विनी संतोष जाधव यांना कॉल करुन माहिती दिल्यानंतर या ठिकाणी जाऊन महावितरण अधिकाऱ्यांना या समस्येची कल्पना दिली. परंतु वायर उपलब्ध होत नाही, अशी उडवाउडवीची उत्तरे दिल्यांनतर अश्विनी जाधव, संतोष जाधव यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरुन जर या कॉलनी मधील नागरिकांची समस्या सोडविली नाही तर महावितरण कार्यालयाला टाळे ठोकणार असल्याचा इशारा दिला.


वरिष्ठांशी बोलल्यावर वायर उपलब्ध करून देत असल्याचे सांगितले. वायर आणून समस्या सोडवणार असल्याचे सांगितले. प्रभागात अशाच प्रकारे जर महावितरण कारभार करणार असेल तर महावितरणचा निषेध करण्यासाठी कार्यालयास टाळे ठोकण्याचे आंदोलन करू नागरिकानी या आंदोलनास सहकार्य करावे, असे आवाहन अश्विनी ताई जाधव यानी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा