Breaking
पिंपरी चिंचवड : प्राणवायूसाठी वडाच्या झाडांचे चिखलीत वाटपचिखली : कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन वटपौर्णिमेच्या औचित्याने सामाजिक कार्यकर्त्या व दत्त दिगंबर महिला नागरी सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षा मंगल राहुल जाधव यांच्या वतीने जाधववाडी प्रभागात बारा ते पंधरा फूट उंच वडाच्या झाडाचे वाटप करण्यात आले.


यावेळी माजी महापौर तथा नगरसेवक राहुल जाधव, प्रमिला जाधव, गौरी घंटे, रुपाली भुजबळ, लता दर्गुडे, गीते, शिवकुमार बायस, शंकर वहिले, बाबासाहेब पाटील व परिसरातील इतर महिला व ग्रामस्थ उपस्थित होते.


मंगल जाधव म्हणाल्या, कोरोना काळात ऑक्सिजनचे महत्व लोकांना समजले आहे. ऑक्सिजनच्या वृद्धीसाठी वड, निंब, पिंपळ यासारख्या वृक्षांचे रोपण होणे ही काळाची गरज आहे. येत्या गुरुवारी (दि. २४) रोजी शहरात वटपौर्णिमेचा सण साजरा होत आहे. 


सुवासिनींकडून वडाजवळ सामुदायिकपणे वडाच्या झाडाचे व वटपौर्णिमेचे पूजन करण्यात येते. या दिवशीचे औचित्य साधत जाधववाडी प्रभागात वडाच्या झाडांचे रोपण करण्याचा संकल्प हाती घेतला. या उपक्रमांतर्गत प्रभागात अनेक ठिकाणी बारा ते पंधरा फूट उंच अशा १८५ वडाच्या झाडांचे वाटप करण्यात आले. वडाचे झाड अत्यंत आरोग्यदायी आहे. वडाच्या झाडाला पर्यावरणात महत्त्वाचे स्थान असून, प्राणवायू देणाऱ्या या झाडाचे उपस्थित महिलांना महत्व पटवून देण्यात आले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा