Breaking
पिंपरी चिंचवड मनपाचा घरकुलमध्ये रात्रीस खेळ चालेपिंपरी चिंचवड : चिखली येथील घरकुल वसाहतीतील अनेक रस्त्याचे डांबरीकरण गेली तीन वर्षे रखडले होते. नागरिकांनी वारंवार मागणी करूनही या रस्त्यांची देखभाल होत नव्हती. मात्र, सात महिन्यावर येऊन ठेपलेल्या पालिका निवडणुकीमुळे अनेक कार्यसम्राट लोकप्रतिनिधी संवेदनशील झालेले आहेत.पावसाची रिमझिम चालू असताना मोहननगर, चिखली जाधववाडी या भागात डांबरीकरण दिवसा सुरू असल्याचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत.मात्र, भर पावसात मध्यरात्री मनपाचे ठेकेदार डांबरीकरण करत असल्याचे व्हिडीओ फोटो झळकले आहेत. २६ जूनच्या मध्यरात्री अंधुक उजेडात घरकुल वसाहतीमध्ये डांबरीकरण सुरू होते. मनपाच्या स्थापत्य विभागातील अधिकाऱ्यांना कार्यतत्परतेचा ध्यास लागल्यामुळे या मान्सून मध्ये हे डांबर टिकेलं का? अशी शंका नागरिक उपस्थित करत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा