Breaking


पिंपरी चिंचवड : माकपची इंधन, घरगुती गॅस दरवाढी विरोधात निदर्शने


सर्व नागरिकांचे मोफत लसीकरण करून आरोग्यव्यवस्था सुदृढ करण्याची मागणी


पिंपरी चिंचवड, दि. १७ : मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यकर्त्यानी पेट्रोल, डिझेल, घरगुती गॅसच्या दरवाढीचा निषेध करत खंडोबा माळ चौक, आकुर्डी येथे निदर्शने केली. तसेच तहसीलदार गीता गायकवाड यांना निवेदन मागण्यांचे निवेदन देण्यात आले.


या निदर्शनाचे नेतृत्व गणेश दराडे, सतीश नायर, अपर्णा दराडे, क्रांतिकुमार कडुलकर,शेहनाज शेख, अमिन शेख, सचिन देसाई, स्वप्निल जेवळे, शैलजा कडुलकर, सुनीता तोरखडे, सुनीता कनोजिया, मेहमुदा गोवे, सुनंदा बिऱ्हाडे, मंगल डोळस, अविनाश लाटकर, किसन शेवते, यल्लमा कोलगवे, रंजिता लाटकर या कार्यकर्त्यानी सहभाग घेतला.■ आंदोलनाच्या मागण्या पुढीलप्रमाणे : 


1. पिंपरी चिंचवड शहरातील आणि औद्योगिक सर्व नागरिकांचे मोफत आणि प्राधान्याने लसीकरण पूर्ण करा. वसाहतीतील सुमारे इ एस आय योजनेतील सर्व 9 लाख श्रमिकांचे प्राधान्याने लसीकरण करण्यासाठी औद्योगिक आस्थापनाच्या सहकार्याने पूर्ण लसीकरण करा.


2. कोरोनाग्रस्त रुग्णांवर सर्व औषधे, इंजेक्शन सहित सरकारी आणि खाजगी रुग्णालयात मोफत उपचार करावेत. लोकसंख्येच्या प्रमाणात आरोग्यसेवा आणि रुग्णालये उपलब्ध करा, सर्व कंत्राटी आणि मानधनावर काम करणाऱ्या नर्सेस, आया, वॉर्डबॉय, ड्राइवर सह आरोग्य कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत वर्ग करा.


3. पेट्रोल डिझेल वरील केंद्र राज्य सरकारचे अंदाजे 27 टक्के कारभार कमी करून मूळ किमतीवर जीएसटी करप्रणाली सुरू करा त्यामुळे संपूर्ण देशात स्वस्त आणि एकाच दराने इंधन विक्री होईल.


4. इंजिनीअरिंग, बांधकाम, इलेक्ट्रिक, इलेक्ट्रॉनिक, रसायन, घातक, ज्वलनशील उत्पादनातील कारखान्यांचे दरमहा सेफ्टी ऑडिट करा, गुणवत्ता, सुरक्षितता या बाबतीत सरकारी अधिकाऱ्यांनी वेळेवर ऑडिट करून त्या सर्व कंपनीचे सेफ्टी संदर्भातील तपशील इंटरनेटवर उपलब्ध करा, MIDC/PMRDA यांच्या कार्यालयात लेबर आयुक्त, सुरक्षा संचालक यांनी संमत केलेले अधिकारी कामगारांच्या तक्रारी नोंदवण्यासाठी नेमा, त्यासाठी स्वतंत्र हेल्पलाईन सुरू करा.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा