Breakingपिंपरी चिंचवड : निगडी प्राधिकरण से.25 मधील सिमेंट रोडच्या कामामुळे परिसरातील नागरिकाच्या समस्या वाढल्या


पिंपरी चिंचवड निगडी प्राधिकरण से.25 मधील सावरकर सदन येथील सिमेंट रोडच्या कामामुळे परिसरातील नागरिकांना अनेक अडचणी होत आहे. प्रामुख्याने लाइट ची केबल वारंवार तोडली जाते. तसेच पाण्याची लाईन, फोन ची केबल ही वारंवार तुटली जाते. त्यामुळे नागरिकांनची व कामगार यांची अनेक वेळा वाद निर्माण होतात. त्यामुळे परिसरातील नागरिकांना कोणताही त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी व बेजबाबदार ठेकेदार वर कार्यवाही करावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आयुक्त, अ प्रभाग अधिकारी, स्थापत्य अधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे.हा रस्ता मुख्य रहदारीचा असून रस्ताच्या दोन्ही बाजूला मोठी नागरी वस्ती आहे. मुळात रस्ता एका बाजूला पुर्ण करुन दुसरी बाजू वाहतूकसाठी ठेवली पाहिजे. पण या ठेकेदार ने सर्व सस्ता खोदला आहे. चालण्याची सुध्दा सोय नाही. रस्त्यावर रोडारोडा, मोठे पाइप पडलेले आहे. पावसाळा सुरू होऊनही पावसाचे पाणी जाण्याची कोणतीही व्यवस्था केली नाही. त्यामुळे पावसाचे पाणी नागरिकांच्या घरात घुसून मोठे नुकसान झाले आहे  त्याची भरपाई मिळावी व पावसाळा सुरू झाला आहे त्यामुळे परिसरातील नागरिकांना कोणताही त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी व बेजबाबदार ठेकेदार वर कार्यवाही करावी अशी मनसेचे शहर अध्यक्ष / नगरसेवक सचिन चिखले, शहर सचिव रुपेश पटेकर, उपशहराध्यक्ष बाळा दानवले, उपविभाग अध्यक्ष सुरेश सकट, उपविभाग अध्यक्ष ओंकार पाटोळे, प्रभाग अध्यक्ष प्राधिकरण दिपेन नाईक, वाॅर्ड अध्यक्ष प्राधिकरण प्रसाद मराठे, शाखा अध्यक्ष ऋषिकेस कांबळे यांनी केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा