Breaking


पिंपरी चिंचवड पोलिसांनी भरोसा सेल सुरु करण्याची मागणी



पिंपरी चिंचवड, दि. २९ : पिंपरी चिंचवड पोलिसांनी भरोसा सेल सुरु करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते सचिन गोडांबे यांनी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तांकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.


निवेदनात म्हटले आहे की, काही दिवसांपूर्वी बातमी आली आहे की फक्त पुणे पोलीस आयुक्त कार्यालयातील भरोसा सेल मध्ये गेल्या वर्षभरात दीड हजार पुरुषांनी महिलांकडून होणाऱ्या शारीरिक, मानसिक छळाबद्दल तक्रारी दाखल केल्या आहेत. या ऑन रेकॉर्ड आलेल्या तक्रारी असल्यामुळे प्रत्यक्ष अशी प्रकरणे अजून जास्त असणार कारण भारतातील पुरुषप्रधान संस्कृतीत महिलांवर जास्त अन्याय, अत्याचार होतो हे जरी खरे असले तरी पुरुषांवर होणाऱ्या अन्यायात ही वाढ होते आहे हेही नाकारून चालणार नाही.


23 जूनला वटपौर्णिमेच्या दिवशीच औरंगाबादेत पत्नी पीडित पुरुष संघटनेच्या लोकांनी पिंपळाची पूजा करून चक्क मागणी केली की, 'आयुष्यभर छळ करणारी तीच बायको नको, आम्हाला अविवाहित ठेवा', असं साकडं ते थेट यमराजला घालतात. औरंगाबादमध्ये पत्नी पीडित पुरुष संघटना आहे. जी महिलांपासून नाहक खोट्या केसेसमध्ये अडकलेले आहेत अश्या पुरुषांना ही संघटना पाठबळ देते. या संघटनेचे सदस्य पुरुष पिंपळाला फेऱ्या मारतात. तेही वटसावित्रीच्या एक दिवस आधी. हे पुरुष वडाला नाही तर पिंपळाला दोरा धरून फेऱ्या मारतात. या फेऱ्याही उलट्या असतात. महिलाप्रमाणेच तेही यमाला साकडे घालतात. त्याची मागणी महिलांच्या मागणीपेक्षा उलटी आहे. आहे तीच पत्नी मला पुढच्या जन्मी नको, त्यापेक्षा आम्हाला अविवाहित ठेव अशी याचना ती करत आहेत. काही महिला आपल्या पतीला नाहक छळतात. केसेस करतात, जेलमध्ये पाठवतात आणि कायदाही महिलांची जास्त बाजू घेतो. मागे मराठी फिल्म इंडस्ट्री मधील एका दिगदर्शकाने पत्नी व मेव्हणाच्या छळाला कंटाळून आत्महत्या केलेली बातमी आपण टीव्हीवर पाहिली आहे.  छळलेला पती परत सात जन्मी मिळावा अशी मागणी करतात, असं पत्नी पीडित पुरुष संघटनेचं म्हणणं आहे. देशात अनेक ठिकाणी अश्या पुरुषांच्या संघटना आहेत.


वर्क फ्रॉम आणि कोरोनाचं संकट असल्याने लोकं घरातच थांबत आहेत. त्याच नवरा-बायकोचे छोट्या-मोठ्या कारणांवरुन वाद होत आहेत. मुलीच्या आई, बहिणींचे इंटरफेअर हे बऱ्याच प्रकरणांत दिसून येत आहे व त्यामुळे अनेक वाद हे विकोपाला जात आहेत त्यामुळे अश्या वेळी पोलीस, त्यांच्याकडील अनुभवी समुपदेशक (कौन्सेलर), वेगळे व्हायचे असल्यास मुले, त्यांचे शिक्षण व इतर खर्च यासाठी वकिलाकडून योग्य कायदेशीर मार्गदर्शन होणे खूपच गरजेचे आहे. 


त्यामुळे पुण्याप्रमाणेच पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय इथेही भरोसा सेल तातडीने सुरु करण्याची गरज आहे. पिंपरी चिंचवड पोलिसांच्या वेबसाईटवर महिला कक्षाचा फोन नंबर आहे त्याचे नाव बदलून भरोसा कक्ष करावा कारण पोलीस व सरकारी यंत्रणेने लिंगनिरपेक्ष (Gender Neutral) काम करणे आवश्यक आहे. तसेच या कक्षाचा स्वतंत्र ई-मेल आयडी असावा. चांगले अनेक समुपदेशक व वकील पोलिसांनी या कक्षात नेमून सामाजिक, कौटुंबिक कलह कमी करण्यास मदत करून उद्ध्वस्त होणारे अनेक संसार वाचवावेत, असेही गोडांबे यांनी म्हटले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा