Breaking
पिंपरीत चक्का जाम, महेश लांडगे, पंकजा मुंढे यांना पोलिसांनी घेतले ताब्यातपिंपरी : ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरून विविध मागण्या करीत भाजपाच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांच्यासह भाजपाच्या कार्यकर्त्यांनी पुणे- मुंबई महामार्गावर पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात आंदोलन चक्काजाम करण्यात आले. दरम्यान पंकजा मुंडे यांच्यासह आमदार महेश लांडगे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.


देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील विविध भागात चक्काजाम आंदोलन घेण्यात येत आहे. ओबीसींच्या आरक्षणासाठी भाजपद्वारे राज्यात जेल भरो आंदोलन सुरू केले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टंन्सच्या नियमांची पायमल्ली होत आहे. पिंपरीतही चक्काजाम आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात भाजपच्या राष्ट्रीय सचिव मुंडे सहभागी झाल्या होत्या. तसेच भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले आहेत.


”महाराष्ट्र राज्य शासनाची खेळी, ओबीसी आरक्षणाचा बळी…ऊठ ओबीसी जागा हो, एकजुटीचा धागा हो… रोहिणी आयोगाशी चर्चा करण्यासाठी त्वरीत समिती गठीत करा…” अशा घोषणा देत विविध मागण्या करीत ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावर चक्काजाम आंदोलन करण्यात आले. कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केल्यांने सोशल डिस्टंसिंगच्या नियमांचा फज्जा उडाला आहे. ”सरकार महिन्यांपासून वेळकाढू पणा करतेय, आरक्षण मिळेपर्यंत निवडणूक होऊ देणार नाही” अशी स्पष्ट भूमिका पंकजा मुंडे यांनी घेतली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा