Breaking
पुणे महापालिका जम्बो कोव्हीड सेंटर बंद करणारपुणे : कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात आल्यामुळे शिवाजीनगर येथील जम्बो कोव्हिड सेंटर बंद करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. जम्बोमध्ये दाखल असलेल्या रुग्णांचा डिस्चार्ज झाल्यानंतर हे बंद केले जाणार आहे.


कोरोनाच्या रुग्णांना वेळेत उपचार मिळावेत, यासाठी राज्य शासन आणि महापालिकने पहिल्या लाटेवेळी शिवाजीनगर येथील सीओईपीच्या मैदानावर जम्बो कोविड सेंटर उभारले आहे. रुग्णसंख्या कमी झाल्यानंतर 15 जानेवारी रोजी जम्बो सेंटर बंद करण्यात आले होते.


मात्र, फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यापासून कोरोनाची दुसरी लाट आल्यानंतर वाढणारी रुग्णसंख्या लक्षात घेवून 22 मार्चपासून पुन्हा जम्बो कोविड सेंटर सुरू करण्यात आले. रुग्णसंख्या जशी वाढेल तसे बेडची संख्या वाढवून 700 वर नेण्यात आली.


मात्र, कोरोना रुग्णसंख्या कमी आणि पॉझिटिव्हीटी रेट कमी झल्याने यापूर्वी जम्बोतील ऑक्सिजन बेड कमी केले आहेत. शिवाय मनुष्यबळ व आवश्यक सुविधांचे व्यवस्थापन करण्यासाठी जम्बो सेंटरमध्ये मागील मंगळवारपासून नवीन रुग्णांचे प्रवेश बंद करण्यात आले आहेत.


शिवाय जम्बोच्या स्टॅबिलिटी रिपोर्टनुसार तेथे १५ जुलैपर्यंत वापरास परवानगी आहे. कोरोनाची रुग्णसंख्या पाहून २२ जूननंतर पुढील निर्णय घेण्यात येईल, असे प्रशासनाने सांगितले होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा