Breaking


पुणे : आशा व गटप्रवर्तकांच्या संपाला जिल्ह्याभरात प्रतिसाद !पुणे : आशा व गटप्रवर्तकांना काल ( दि.१५ ) पासून राज्यव्यापी बेमुदत संप पुकारला आहे. आज मंत्रालयात बैठक होत आहे. काल पासून सुरू झालेल्या संपाला आशा व गटप्रवर्तकांनी प्रचंड प्रतिसाद दिला आहे. अनेक ठिकाणी आशा व गटप्रवर्तकांनी निदर्शने केली.


काल पासून राज्यातील सुमारे 70 हजार आशा कर्मचारी व गटप्रवर्तक बेमुदत संपावर आहेत. आशा कर्मचारी व गटप्रवर्तक यांना सरकारी कर्मचार्‍यांचा दर्जा द्यावा, तोपर्यंत18 हजार रुपये किमान वेतन आशांना दरमहा 18000/रुपये, गटप्रवर्तकांना दरमहा 22000/ रुपये याप्रमाणे किमान वेतन मिळावे व कोविड महामारीत केलेल्या कामासाठी प्रोत्साहन भत्ता शहरी व ग्रामीण भागातील आशा आणि गटप्रवर्तक यांना मिळावा, निश्चित मानधनात या काळात कपात करण्यात आली आहे ती परत द्यावी, सर्व मोबदल्याच्या थकीत रकमा तातडीने अदा करण्यात याव्यात, आशा कर्मचाऱ्यांना आरोग्य सेवेत भरती करताना प्राधान्य देण्यात यावे या मागण्यांसाठी हा संप आहे .पुणे जिल्ह्यातील देहू रोड, खानापूर, पेरणीला, खडकवासला यांसह विविध ठिकाणी निवेदन आणि निदर्शने करण्यात आली. यामध्ये सुजाता काकडे, साधना यादव, ,सुजाता साळुंखे, कविता मुळे, करिष्मा हगवणे, इंदिरा सोणवणे यांच्यासह मोठ्या संख्येने आशा व गटप्रवर्तक सहभागी झाल्या.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा