Breaking
पुणे : विद्या जावळे - निगळे यांची विभागीय वनहक्क समितीच्या सदस्य पदी निवड !पुणे, दि. २९ : पुणेे विभागीय आयुक्त वनहक्क समिती सदस्य पदी विद्या जावळे - निगळे यांची निवड करण्यात आली आहे.


भारतीय संवधिनाच्या पाचव्या अनुसुचीच्या परिच्छेद ५ च्या उप परिच्छेद (१) अन्वये भारतीय संवधिनाच्या अनुच्छेद २४४ च्या खंड (१) मध्ये महाराष्ट्र राज्याच्या नमुद अनुसुचित क्षेत्रासाठी जाहिर केलेल्या अधिसुचनेनुसार, अनुसुचित जमाती व इतर पारंपारीक वन निवासी (वनहवकांची मान्यता) अधिनियम, २००६ व नियम २००८ आणि सुधारीत नियम, २०१२ अंतर्गत जिल्हास्तरीय वनहक्क समितीने नामंजुर केलेल्या अनुसुचित क्षेत्रातील वनहक्क अपिलांच्या दाव्यांवर निर्णय घेण्यासाठी विभागीय आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय वनहक्क समिती स्थापन करण्यात आलेली असुन सदर विभागीय वनहक्क समितीमध्ये सदस्य म्हणुन निवड करण्यात आलेली आहे.


विभागीय समितीने अनुसुचित जमाती व इतर पारंपारिक वन निवासी ( वनहक्कांची मान्यता ) अधिनियम, २००६ व नियम २००८ आणि सुधारीत नियम २०१२ अंतर्गत जिल्हास्तरीय वनहक्क समितीने अमान्य केलेल्या अनुसुचित क्षेत्रातील वनहक्क दाव्यांचे अपिलावर अंतिम निर्णय घेण्याचे कामकाज करणार आहे. 


या समितीचे अध्यक्ष पुणे विभागीय आयुक्त असून सचिव एकात्मिक आदिवासी विकास विभागाचे प्रकल्प अधिकारी आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा