Breaking
पूर्णा : शेतकऱ्यांच्या समर्थनात विद्यार्थी, तरुण व महिला!पूर्णा : केंद्र सरकारने आणलेल्या तीन नव्या कृषी कायद्याच्या विरोधात शेतकरी दिल्लीच्या सीमेवर तळ  ठोकून बसले आहेत. तसेच देशातील विविध भागात देखील या नव्या कृषी कायद्याचा मोठा विरोध केला जात आहे, शेतकऱ्यांच्या या संघर्षाला २६ जूनला ७ महिने पूर्ण होत आहेत.


सरकारच्या या असंवेदशील वृत्तीचा अतिरेक झालेला आहे. केंद्राने लादलेल्या शेतकरी व लोकविरोधी कायद्यांना रद्द करण्यासाठी हा लढा मागील सात महिने चालू आहे आणि चालूच असणार आहे असे आंदोलकांचे म्हणणे आहे. आंदोलनाच्या मागण्यामध्ये प्रामुख्याने शेतकरी विरोधी तीन कायदे रद्द करा, शेतीमालाला कायदेशीर हमीभाव द्या, बेरोजगार तरुणांना बेरोजगार भत्ता द्या, आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला बळ देण्यासाठी देशातील विद्यार्थी, युवक व महिला संघटनांनी परत एकदा पुढाकार घेतला आहे. संयुक्त किसान मोर्चाच्या २६ जूनच्या आंदोलनाला AIDWA ही महिला संघटना, DYFI ही युवक संघटना व SFI ही विद्यार्थी संघटना यांनी सक्रिय पाठिंबा दर्शविला आहे. याचाच एक भाग म्हणून परभणी जिल्ह्यातील या तिन्ही संघटनांच्या प्रतिनिधींनी या आंदोलना संदर्भातील निवेदन पूर्णा तहसीलदार यांच्याद्वारे राष्ट्रपतींना पाठविण्यात आले आहे.


निवेदनावर नसीर शेख, अमन जोंधळे, किरण खंदारे व जय एंगडे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा