Breakingराजेंद्र पाडवी यांची बिरसा फायटर्स महाराष्ट्र राज्य महासचिव पदी निवडसांगली : राजेंद्र पाडवी यांची बिरसा फायटर्सच्या महाराष्ट्र राज्य महासचिव  पदी निवड  करण्यात आली आहे. सुशिलकुमार पावरा संस्थापक अध्यक्ष बिरसा फायटर्स यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 24 जून 2021 रोजी बिरसा फायटर्स महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी विस्तार व विदर्भ-पुणे विभागातील नवीन शाखा पदग्रहण सोहळासाठी झूम सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत राजेंद्र पाडवी  यांची महाराष्ट्र राज्य महासचिव पदी निवड केल्याची  घोषणा सुशिलकुमार पावरा संस्थापक अध्यक्ष बिरसा फायटर्स  यांनी केली.


महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी पुढीलप्रमाणे : 


राज्याध्यक्ष मनोज पावरा, उपाध्यक्ष राजेश धुर्वे, महासचिव राजेंद्र पाडवी, महानिरीक्षक केशव पवार, कार्याध्यक्ष नंदलाल पाडवी, कोषाध्यक्ष दादाजी बागूल, राज्य प्रवक्ता रोहित पावरा, सल्लागार अॅड.जगदीश पावरा, अॅड.रमेश पावरा, अॅड.सतीश नाईक, महिला प्रतिनिधी श्रीमती चंद्रभागा पवार, संघटक ज्ञानेश्वर बर्डे, प्रसिद्धी प्रमुख हसन तडवी, राज्य सदस्य मनोहर पाडवी, देवीदास वसावे, अशोक वळवी, जहांगीर पावरा, अर्जून जाधव याप्रमाणे महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी निवड करण्यात आली आहे. 


आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी व आदिवासी समाजाच्या समस्या सोडविण्यासाठी आपण सगळे एकत्र काम करू या. माझ्या वर दिलेली जबाबदारी मी यशस्वीपणे पार पाडीन. बिरसा फायटर्स संघटनेच्या गाव तिथे शाखा होतील. लवकरच महाराष्ट्र भर बिरसा फायटर्स नावारूपाला येईल, अशी प्रतिक्रिया नवनिर्वाचित महाराष्ट्र राज्य महासचिव राजेंद्र पाडवी  यांनी व्यक्त केली.   


राजेंद्र पाडवी यांची बिरसा फायटर्सच्या राज्य महासचिव पदी निवड झाल्याबद्धल उपस्थित पदाधिकारी यांनीअभिनंदन केले आहे व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा