Breaking


राजेश धुर्वे यांची बिरसा फायटर्सच्या महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष पदी निवडयवतमाळ, दि. 25 : राजेश धुर्वे  यांची बिरसा फायटर्सच्या महाराष्ट्र उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे. सुशिलकुमार पावरा संस्थापक अध्यक्ष बिरसा फायटर्स यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 24 जून 2021 रोजी बिरसा फायटर्स महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी विस्तार व विदर्भ-पुणे विभागातील नवीन शाखा पदग्रहण सोहळासाठी  झूम सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत राजेश धुर्वे यांची उपाध्यक्ष पदी निवड केल्याची घोषणा सुशिलकुमार पावरा संस्थापक अध्यक्ष बिरसा फायटर्स यांनी केली.

   

आदिवासी समाजाच्या हितासाठी, सर्वांगीण विकासासाठी व आदिवासी समाजाच्या समस्या सोडविण्यासाठी कायदेशीर व रस्त्यावर उतरून लढाई  आपण सगळ्यांनी लढू या.संघटनेत मी पूर्ण पणे जबाबदारीने काम करेन व नियमांचे पालन करेन. माझ्या वर जो विश्वास दाखवला आहे तो मी खरा करून दाखवेन. सुशीलकुमार पावरा संस्थापक अध्यक्ष यांनी माझी उपाध्यक्ष पदी निवड केल्याबद्दल आभारी आहे, अशी प्रतिक्रिया नवनिर्वाचित उपाध्यक्ष राजेश धुर्वे  यांनी व्यक्त केली.   


राजेश धुर्वे यांची बिरसा फायटर्सच्या महाराष्ट्र उपाध्यक्ष  पदी निवड झाल्याबद्धल उपस्थित पदाधिकारी यांनी अभिनंदन केले आहे व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा