Breakingजागतिक पर्यावरण दिनानिमित्त रेस्क्यू फोर्स तर्फे वृक्षारोपण संपन्नकोल्हापूर (यश रुकडीकर) : जागतिक पर्यावरण दिनानिमित्य कोल्हापूर महानगरपालिका माजी आयुक्त व सध्यचे भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणाचे संचालक मल्लिनाथ कलशेट्टी यांनी उद्घाटन केले व कोल्हापूर वासीयांना जागतिक पर्यावरण दिनाच्या शुभेच्छा दिल्या.


कोमनपा व स्वरा फौंडेशन तर्फे जयंती पंपिंग स्टेशन येथे कोल्हापूरचे अतिरिक्त मनपा आयुक्त नितिन देसाई, लक्ष्मीपुरी स्टेशनचे पोलिस निरीक्षक अनिल गुजर, वाहतूक पोलीस निरीक्षक स्नेहा गिरी यांच्या हस्ते वृक्षारोपण पार पडले. त्यावेळी वड, पिंपळ, जांभुळ, बदाम, कदंब, करंज, गुलमोहर व बकुळ अशी झाडे लावण्यात आली.


यावेळी स्वरा फौंडेशन डायरेक्टर प्राजक्ता माजगावकर, पाणीपुरवठा व ड्रेनेज अभियंता आर. के. पाटील, अध्यक्ष सविता पाडलकर, उपाध्यक्ष अमृता वास्कर, अध्यक्ष पियुष हुलस्वार, जीवन आधार रेस्क्यू फोर्सचे अधिकारी विनायक लांडगे, स्वरा फौंडेशन सदस्य फैजाण देसाई, सतीश वडणगेकर, उदय पाटील, रमेश नेर्लेकर, शिवाजी मगदूम, प्रमोद माजगावकर तसेच रेस्क्यू फोर्स सदस्य मानसी कांबळे, उत्कर्षा कांबळे, संग्राम पाटील, नितीन गवळी, नितेश गवळी, पियुष हुल स्वार आदी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा