Breaking


सांगली : आशा व गटप्रवर्तकांचे पालकमंत्र्यांच्या कार्यालयासमोर शेकडो महिलांचे धरणे आंदोलन



जो पर्यंत मागण्या मान्य होणार नाहीत तो पर्यंत संप सुरूच राहिल - मिना कोळी 


सांगली, दि. २१ : आज आशा व गटप्रवर्तक संघटनेच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व पालकमंत्री जयंत पाटील यांच्या कार्यालयावर जोरदार धरणे आंदोलन करण्यात आले. यामध्ये ६०० पेक्षा जास्त महिला सहभागी झाले असल्याची माहिती संघटनेच्या जिल्हा अध्यक्ष मिना कोळी यांंनी दिली.

 

१५ जून २०२१ पासून राज्य व्यापी बेमुदत संप पुकारला आहे. त्यात सांगली जिल्ह्यातील आशा वर्कर्स व गट प्रवर्तक सहभागी आहेत. आज संपाचा सातवा दिवस आहे पण अजून आपले सरकारने काहीही दखल घेतली नाही. सरकारने मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेतला नाहीत तर बेमुदत संप चालूच ठेवण्याचा निर्धार आशा व गटप्रवर्तकांंनी केला असल्याची माहिती संघटनेच्या अध्यक्षा कोळी यांनी सांगितले.



■ आशा व गटप्रवर्तकांच्या मागण्या पुढीलप्रमाणे : 


● सार्वजनिक आरोग्य व्यवस्था मजबूत करा.


● आशा व गटप्रवर्तकाना आरोग्य कर्मचारी म्हणून केले पाहिजे.


● आशाना १८,००० रू. व गटप्रवर्तकाना २२,००० रू. वेतन मिळाले पाहिजे. 


● आशा व गटप्रवर्तकाना प्रतिदिन ३०० रू. कोविड भत्ता मिळाला पाहिजे. 


● आशा व गटप्रवर्तकाना माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेचा सर्व टप्प्याचा मोबदला मिळाला पाहिजे. 


● कोरोना बाधित आशा व गटप्रवर्तक व त्यांच्या कुटुंबियांना व्हेंटिलेटरसह बेड राखीव ठेवण्यात यावेत.


● अँटीजेनचे टेस्टचे काम आशांवर लादू नये.


● आरोग्य कर्मचाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू झाल्यास 50 लाखाचा विमा कवच आहे, त्यामध्ये आशा व गटप्रवर्तक यांचा स्पष्ट उल्लेख करावा.


● आरोग्यवर्धिनी समूह मध्ये गटप्रवर्तकना १५०० रू. दरमहा मोबदला द्यावा.


● प्रेरणा प्रकल्प रिपोर्टिंग साठी गटप्रवर्तकना १५०० रू सहामाही भत्ता व स्टेशनरी साठी ३००० रू. वार्षिक रक्कम द्यावी.


◆ आरोग्यसेविका भरतीमध्ये आशा व गटप्रवर्तक ना 50 टक्के आरक्षण मिळावे.  


● आशांना योजनाबाह्य व मोबदला नसलेले काम देऊ नये. 


● दरमहा मोबदल्याची हिशोब पावती आशा व गटप्रवर्तकांना द्यावी. 


यावेळी संघटनेचे जिल्हा सचिव उमेश देशमुख, जिल्हा संघटक हनमंत कोळी, वर्षा ढोबळे, शबाना आगा, अजु नदाफ, सुरेखा जाधव, दिपाली हारे, लता जाधव, अनुपमा गौड, विमल जाधव, सुषमा आमरल, राणी चौघुले, शैला जमादार यांसह मोठ्या संख्येने पदाधिकारी कार्यकर्ते मोर्चात उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा