Breakingसांगोला : हातीद येथील गावकऱ्यांनी जोपासली सामाजिक बांधिलकीसंसदरत्न खा. सुप्रिया सुळे यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण


सांगोला / अतुल फसाले : महाराष्ट्र व देशातील सर्वात जास्त प्रश्न संसदेत मांडून त्यावर लक्ष केंद्रित करणाऱ्या अभ्यासू संसदपटू, अनेक वेळा संसदेत उत्कृष्ट कार्य म्हणून विविध पुरस्काराने सन्मानित, कोणताही अविर्भाव नसणाऱ्या महाराष्ट्राचे उज्ज्वल नेतृत्व, अभ्यासू व कर्तव्यदक्ष खासदार आणि पुरोगामी धर्मनिरपेक्ष विचारांशी बांधिलकी असलेल्या राष्ट्रीय पातळीवरील महाराष्ट्राच्या नव्या पिढीच्या नेत्या संसदरत्न खा.सुप्रिया सुळे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने हातीद तालुका सांगोला येथील गावकऱ्यांनी वृक्षारोपण करून सामाजिक बांधिलकी जोपासत वाढदिवस साजरा केला आहे. 


आजच्या या कोरोना महामारीच्या वाईट परिस्थिती मध्ये गावकऱ्यांनी काळाची गरज ओळखून वाढदिवसाच्या अनाठायी खर्चाला बगल देऊन कौतुकास्पद कार्य हाती घेऊन हातीद परिसर व हातीद मधील सर्व जिल्हा परिषद शाळा व श्रीराम विद्यालय हातीद येथे वृक्षारोपण करून सामाजिक बांधिलकी जोपासली आहे या कार्याचे तालुक्याच्या सर्व स्तरातून कौतुक होत आहे. या प्रसंगी हातीद गावच्या सरपंच शालन तानाजी भगत, उपसरपंच कुलदीप घाडगे, ग्रा.सदस्य शहाजी घाडगे, बबन पवार, बबन घाडगे,आकाराम घाडगे, हिंदुराव घाडगे, माजी सरपंच नारायण माळी, तानाजी घाडगे, शिवाजी चव्हाण, प्रमोद घाडगे, विजयसिंह घाडगे, रणजीत भगत, सिद्धनाथ पवार, शहाजी घाडगे, दिलीप घाडगे, अमर पाटील, आण्‍णासो घाडगे व श्रीराम विद्यालय हातीद या विद्यालयाचे मुख्याध्यापक गावडे व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा