Breaking
जुन्नरमधील सरपंचांचे पुणे - नाशिक महामार्गावर रास्ता रोको आंदोलननारायणगाव, दि. २९ : जुन्नर तालुक्यातील ९० सरपंचांनी पुणे - नाशिक महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. जुन्नर तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या स्ट्रीट लाईट कनेक्शन खंडित करण्यास महावितरण कंपनीकडून सुरुवात केली आहे. हे वीज बिल ग्रामपंचायतीने भरावे असे शासनाकाडून आदेश देण्यात आले होते. परंतु ग्रामपंचायतीला हे शक्य होत नसल्याच्या निषेर्धात जिल्हा परिषद सदस्या आशा बुचके यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.


दरम्यान, पुणे - नाशिक महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करणाऱ्या ४० जणांंवर नारायणगाव पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई केली अशी माहिती नारायणगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांनी दिली .


महावितरण कंपनीने ग्रामपंचायतीना थकबाकीच्या नोटिसा जारी करून स्ट्रीट लाईट कनेक्शन खंडित करण्यास सुरुवात केली आहे. वीज वितरण अधिकाऱ्यांनी हि कारवाई थांबबावी यासाठी जुन्नर तालुका सरपंच परिषदेच्या वतीने महावितरण कंपनीचे नारायणगाव विभागाचे उपकार्यकारी अभियंता सिद्धार्थ सोनवणे यांना निवेदन दिले. यावेळी पंचायत समिती सदस्य गावातील सरपंच, उपसरपंच, सदस्य उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा