Breaking'शेती वाचवा, लोकशाही वाचवा' शेतकरी विरोधी कायदे रद्द करा किसान सभेची मागणीनांदेड : 'शेती वाचवा, लोकशाही वाचवा' शेतकरी विरोधी कायदे रद्द करा व स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करा या मुख्य मागण्या घेऊन आज २६ जून रोजी देशभरात तहसील कचेरी समोर आंदोलन करण्यात आली. 


याचाच भाग म्हणून नांदेड जिल्हाधिकारी यांच्या मार्फत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना जनआंदोलन संघर्ष समितीच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे. या निवेदनावर कॉ. विजय गाभणे, कॉ. गंगाधर गायकवाड, कॉ. उज्वला पडलवार, मारोती केंद्रे, करवंदा गायकवाड, मंजूश्री कबाडे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. 


दिल्ली येथील सीमेवर शेतकऱ्यांचे आंदोलन चालू असून आज २६ जून रोजी त्या आंदोलनास सात महिने पूर्ण झाले आहेत. त्या अनुषंगाने केंद्र सरकारने आपले अडमूठे धोरण सोडून शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य कराव्यात व राष्ट्रपतींनी हस्तक्षेप करावा अशी मागणी जनआंदोलन संघर्ष समितीच्या वतीने करण्यात आली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा