Breakingशालेय पोषण आहार कामगारांचे सरकारच्या धोरणा विरोधात तहसील कार्यालया समोर धरणे अंदोलनकिल्लेधारूर : शालेय पोषण आहार कामगारांनी विविध मागण्यासाठी महाराष्ट्र शालेय पोषण आहार संघटनेच्या वतीने तहसील कार्यालया समोर धरणे आंदोलन करण्यात आले व तहसीलदारला मागण्यांचे निवेदन देण्यात आले. तसेच मागण्या तात्काळ मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.


धारूर तालुक्यात शालेय पोषण आहार संघटनेच्या वतीने विविध मागण्यासाठी तहसील कार्यालयासमोर आज धरणे आंदोलन करण्यात आले, यामध्ये प्रामुख्याने कामगार विरोधी कायदे रद्द करा, सेंट्रल किचन पद्धती रद्द करा, शालेय पोषण आहार कामगारांना नियमित मानधन द्या, शालेय पोषण आहार कामगारांना तमिळनाडू राज्याप्रमाणे अकरा हजार रुपये मानधन द्या, कामगारांना स्वयंपाकीचा दर्जा द्या, अशा विविध मागण्यांसाठी हे धरणे आंदोलन करण्यात आले. हे आंदोलन शालेय पोषण आहार संघटनेचे जिल्हा सचिव डॉ. अशोक थोरात आणि जिल्हा सहसचिव मिरा शिंदे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले.


यावेळी तालूकाध्यक्ष लक्ष्मन डोंगरे, तालूका सचिव  लता खेपकर, वैशाली आडसूळ, इंदूताई खेपकर शोभाताई सोंळके आदी सह कामगार सहभागी झाले होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा