Breaking



नायफड (नाव्हाची वाडी) पाणी प्रश्न निकाली काढा, अन्यथा किसान सभेचा आंदोलनाचा इशारा

संग्रहित छायाचित्र
खेड, दि.७ : नायफड ( नाव्हाची वाडी ) पाणी प्रश्न निकाली न काढल्यास आंदोलन करण्याचा इशारा अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने देण्यात आला आहे.

ग्रामस्थांना पाणी प्रश्नावर बोलताना "ग्रामसेवक शितल लकारे म्हणाल्या होत्या की, त्या वस्तीत साधी दोन चाकी सुद्धा जात नाही. त्यामुळे त्यांचा पाणी प्रश्न सध्या तरी सोडवता येणार नाही.

सरपंच व ग्रामसेवक नागरिकांना म्हणाले, सर्व निधी तुमच्या वस्तीचा पाणीप्रश्न सोडवण्यासाठी खर्च केला तर बाकी वाड्या वस्त्यांना कुठून पैसे आणायचे तसेच पैसे कमी असल्यामुळे आम्ही हा प्रश्न नाही सोडवू शकत नाही.  


त्यानंतर पुणे जिल्हा किसान सभेचे अशोक पेकारी यांनी दि. ५ जून रोजी नाव्हाची वाडी येथे जाऊन ओढ्यातील पाण्याची, विहीर व लोक वस्ती याची पहाणी करुन ग्रामस्थांसोबत चर्चा केली.

ग्रामस्थ म्हणाले, उन्हाळी दिवसांत आम्हाला पाणी आणायला त्रास होतो. परंतु आमच्या वस्तीतील लोकांना पावसाळी दिवसांत ओढ्याला पूर येतो तरी सुद्धा आम्हाला जीव मुठीत धरून ओढ्यातील कंबरेच्या वर पाण्याचा पूर पार करून पाणी आणावे लागते. अश्या वेळी कधी पाण्यात पाय घसरेल व कधी पुराच्या पाण्यात वाहून जाऊ ही भीती धास्तावत असते. त्यामुळे आम्हास आतिशय लवकरात लवकर पाण्याची नळ योजना मिळावी." 

तसेच वस्तीसाठी नळ योजनेसाठी अनेक काही संस्था मदत करायला तयार आहेत. पण आम्हाला ग्रामपंचायत मधून ठराव मिळत नसल्याने हतबल होतो, डांबरी रस्ता ते वस्ती अंतर्गत रस्ता हे १५० मीटरचा रस्ता ठक्कर बाप्पा योजनेअंतर्गत दोन वर्षांपूर्वी मंजूर झाला आहे. पण त्याचे काम अजून  पूर्ण झाले नाही. अशा व्यथा ग्रामस्थांनी मांडल्या.


यावेळी बोलताना किसान सभेचे नेते अशोक पेकारी म्हणाले की, आपण ग्रामपंचायत मधून लवकर ठराव घेऊन रोटरी क्लब तसेच जानकी बजाज यासारख्या मदत करणाऱ्या संस्थेकडे द्यावेत. यांकडून पाणी टाकी व पाईप लाईन साठी मदत घेऊ. तसेच ठक्कर बाप्पा योजने अंतर्गत जो रस्ता आला आहे. त्याची मान्यताप्राप्त प्रत भेटली तर आपण त्या विषयावर प्रकल्प अधिकारी घोडेगाव यांच्याशी चर्चा करू व राहिलेली विकास कामे पूर्णतवास नेण्यासाठी ग्रामपंचायतीसोबत समन्वय साधू, असेही म्हणाले.

तसेच विकास भाईक म्हणाले, वारंवार ग्रामपंचायत ला या विषयावर माहिती देऊनही ते या विषयांकडे जर जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत. दोन महिन्यांत पाणी प्रश्न जर मार्गी नाही लागला तर आम्ही सर्व वाडीकर ग्रामपंचायत समोर लोकशाही मार्गाने आंदोलन करु असा इशाराही दिला आणू असा.  

यावेळी किसान सभेचे सखाराम जोशी, तसेच ग्रामपंचायत सदस्य सुनिल मिलखे, दामू कावळे, मधू कावळे, माजी ग्रामपंचायत सदस्य सुरेश तिटकारे, युवा कार्यकर्ते श्याम मिलखे, अनिल मिलखे हे ग्रामस्थ उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा